सुवर्ण सिंहासनाच्या कार्याला खीळ बसण्यासाठी पू. गुरूजींना गोवण्याचा प्रयत्न ! – बळवंत दळवी, मुंबई कायर्र्वाह, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

175

मागे वारकरी धारकरी संगमावर असाच एक प्रकार घडला होता. त्या वेळी नंग्या तलवारी घेऊन भिडेगुरुजी यांचे समर्थक वारीत घुसले, अशी खोटी बातमी पसरवण्यात आली. प्रत्यक्षात हा वाद पोलीस आणि चोपदार यांच्यामध्ये झाला होता. असाच प्रकार पुन्हा होत आहे. पू. गुुरुजी तिकडे गेलेच नाहीत, पू. गुरुजी त्याच्याविषयी एक शब्दही बोललेले नाहीत, गुरूजींचा ऑडिओ उपलब्ध नाही, साधे पत्रही नाही, तर मग गुरुजींनी दिलेल्या चिथावणीमुळे कोरेगाव भीमा वाद झाला, असे कसे काय म्हणता ? म्हणे गुरुजींच्या चिथावणीची व्हॉट्सअ‍ॅपवर पोस्ट फिरत होती. पू. गुरूजींचे विरोधकही अशी पोस्ट पाठवू  शकतात. श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानमध्ये दलित बांधवही आहेत. या दलित बांधवांकडे पू. गुरुजी जेवायला जातात. ते जे काही वाढतील ते गोडधोड मानून घेतात. संघटनेत काम करतांना आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना मानतो. त्यांनी कधी जात-पात मानली नाही, तर धारकरी कसे मानतील. गुरूजींनी कधी जात-पात मानली नाही, तर आम्ही कशी मानू ? पू. भिडे गुरुजी यांच्यावर अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा प्रविष्ट करण्यापूर्वी पोलिसांनी या प्रकरणाची माहिती घेणे आवश्यक होते. रायगडावर साकार होणारे सुवर्ण सिंहासन ही सर्वांची पोटदुखी आहे. त्यासाठी या प्रकरणात त्यांचे नाव गोवण्यात येत आहे; मात्र सत्य हे कधीही दडपून रहात नाही, या प्रकरणातील सत्य बाहेर येईल.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।