तळेगाव – नान्ही मार्गावरील जंगलात एका १८ ते २० वर्षीय युवतीची गळा चिरून हत्या

0
976
Google search engine
Google search engine

कुरखेडा/गडचिरोली- 

 

एका युवतीची गळा चिरुन हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना आज सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास कुरखेड्यापासून अवघ्या १ किलोमीटर अंतरावरील गांधीनगर-तळेगाव रस्त्यावरील जंगलात उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.
डिप्राटोला-तळेगाव हा मार्ग साधारणत: ३ किलोमीटर लांबीचा असून, तो फार वर्दळीचा नसतो. या मार्गावर डिप्राटोला गावापासून एक किलोमीटर अंतरावरील जंगलात एक युवती मृतावस्थेत असल्याचे गुराख्यांना आढळून आली. जवळ जाऊन पाहिले असता तिचा गळा चिरल्याचे दिसून आले. ही वार्ता पसरताच परिसरात खळबळ माजली. उपविभागीय पोलिस अधिकारी श्री  शैलेश काळे, सहायक पोलिस निरीक्षक श्री गजानन पडळकर हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. मृत युवतीचा वर्ण गोरा असून, ती ५ फूट उंचीची आहे. तिचे वय अंदाजे १७ ते १८ वर्षे असावे. तिने काळा जीन्स पँट, टॉप व त्यावर काळ्या रंगाचा जर्किन परिधान केला होता.