पाणीपुरवठा नियमित करून वारंवार होत असलेली दरवाढ थांबवा राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे जीवन प्राधिकरण ला निवेदन

0
566
Google search engine
Google search engine

अमरावती:-


आज दी. 2-2-2018 रोजी अमरावती शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे अमरावती शहरात होत असलेल्या पिण्याच्या पाण्याचा अनियमित पाणीपुरवठा नियमित करण्याबाबत व वारंवार होत असलेली पाणी बिलाची दरवाढ थांबविण्याबाबत निवेदन देण्यात आले
गेल्या काही दिवसांपासुन शहरात अपूरा व अनियमित पाणीपुरवठा होत आहे. पाणी हे जीवनाची मूलभूत गरज असुन त्याचा नियमीत पुरवठा होणे अत्यावश्यक आहे तसेच सतत होणाऱ्या दरवाढीचा पण नागरिकांना फटका बसत आहे.पाणी पुरवठा विभागाने नियमीत व मुभलक पाणीपुरवठा उपलब्ध न करुण देता केलेली दरवाढ ही अन्यायकारक तसेच सामान्य नागरिकांना न परवडणारी आहे.जनतेचा आक्रोश लक्षात घेऊन पाणीपुरवठयाचा प्रश्न तात्काळ सोडविण्यात यावा ही मागणी रा.यु.कॉ.शहर अध्यक्ष सतीश उर्फ़ गुडडू ढोरे यांच्या नेतृत्वात व रा.कॉ. शहर अध्यक्ष राजेंद्र महल्ले यांच्या मार्गदर्शनात अमरावती शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस व समस्त अमरावती करांच्या वतीने करण्यात आली.येत्या 15 दिवसात योग्य कार्यवाही न केल्यास अमरावती शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस तर्फे तिव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.