सुरू असलेल्या रस्त्याचे काम व्यवस्थित करून घ्या >< भाजपाच्या महिला नगरसेविकेचे मुख्याधिकाऱ्यांना पत्र - काम बरोबर होत नसल्याचा ठपका

0
675
Google search engine
Google search engine
चांदुर रेल्वे – (शहेजाद खान ) 
     शहरात सुरू असलेल्या एका रस्त्याचे काम बरोबर होत नसल्याचा ठपका ठेवत सदर सुरू असलेले रस्त्याचे काम व्यवस्थित करून घेण्यासाठी भाजपाच्या महिला नगरसेविकेने मुख्याधिकाऱ्यांना पत्र लिहले आहे. यामुळे प्रथमच नगरसेविका रस्त्यांसाठी आक्रमक झालेल्या पहावयास मिळाल्या.
      शहरात रस्त्यांच्या विकासकामांचा सपाटा सुरू आहे. अशातच शहरातील प्रभाग क्र. ३ मधील शिक्षक कॉलनी समोरील फारूख मेमन यांच्या घरापासुन ते जोरावर खॉ पठान यांच्या घरापर्यंत सुरू असलेल्या डांबरीरस्त्याचे काम व्यवस्थित होत नसुन खडीकरण बरोबर होत नसल्याचा आरोप नगरसेविका सौ. सुरेखा विलास तांडेकर यांनी केला आहे. रस्त्याच्या एका बाजुला लेवल सुध्दा नाही. सदर काम व्यवस्थित होत नसुन या कामावर जातीने लक्ष घालुन काम चांगल्या पध्दतीने करून घेण्याची मागणी सौ. तांडेकर यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे. नगरसेविकेच्या या पत्रावरून मुख्याधिकारी लक्ष देणार का? याकडे लक्ष लागले आहे.