*रिटेंलिंगच्या विद्यार्थ्यांसाठी सवांद कौशल्यावर आधारीत चर्चासञ संपन्न*

0
713
Google search engine
Google search engine

हीवरखेड(विशेष प्रतीनीधी )

येथील जि.प.महात्मा गांधी विद्यालय येथे दि.७ मार्चला स.१० वा.रिटेंलिंग मधील संवाद कौशल्य बाबत चर्चासञ पार पडले.या चर्चासञाला प्रमुख वक्ते संतोष विणके हे लाभले होते.मंचावर पर्यवेक्षक साबळे सर ,प्रकाश पाटील (जिल्हा समन्वक LAHI),व्यवसाय शिक्षक संदेश वईलकर व कु. गावंडे मैडम यांची उपस्थीती होती.मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले प्रमुख वक्ते संतोष विणके यांनी विद्यार्थ्यांना किरकोळ व्यापार क्षेञातील संवाद कौशल्याबाबत माहीती सांगीतली.यात त्यांनी संवाद कौशल्याची गरज ,संवादाच्या विविध पद्धती ,संवादातील अडथळे याविषयी विविध उदाहरणं देऊन विद्यार्थ्यांना बोलतं केलं.नवनिर्मितीसाठी चाकोरी बाहेरचा निर्धार ,आत्मविश्वास कसा गरजेचा आहे.हे त्यांनी विविध खेळ व प्रयोगांद्वारे विद्यार्थ्यांना सहभागी करुन घेत सादर केले.राष्ट्रीय माध्यमीक शिक्षा अभियानाद्वारा कौशल्य आधारीत व्यवसाय शिक्षण विद्यार्थांना उपलब्ध असुन यातीलच रिटेलिंग या विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.यावेळी साबळे सर यांनी मनोगत व्यक्त केले तर प्रकाश पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्तावीक व्यवसाय शिक्षक संदेश वईलकर यांनी केले .संचालन कु.मंजू परनाटे व कु.धनश्री सुरजूसे तर आभार प्रदर्शन कु.आरती ठवकर ने केले.हसत खेळत पार पडलेल्या या चर्चासञाचा विद्यार्थ्यानी आनंद घेतला.