वरुड तालुक्यातील तीनही ट्रेनिंग सेंटरवर आमिर खान यांचा वाढदिवस शोष खड्डे खोदून केला साजरा  – करजगाव , सावंगा , गव्हांनकुंड येथील प्रशिक्षण केंद्रावर तयार केले शोषखड्डे

0
693
Google search engine
Google search engine

पाणी फाउंडेशनच्या प्रशिक्षणार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण !

रुपेश वाळके / विशेष प्रतिनिधी –

पाणी फाउंडेशनच्या रूपाने संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या चळवळीत लोकांचा उत्स्फूर्त सहभाग वाढत आहे़ महाराष्ट्राला दुष्काळमुक्त बनवण्यासाठी आमिर खान यांनी २०१६ साली पाणी फाउंडेशनची स्थापना केली असून ही दुष्काळावर मात करण्यासाठी काम करणारी एकमेव लोकचळवळ आहे.

पाणी फाउंडेशनच्या प्रशिक्षणामुळे आमची हिंमत वाढवली व आम्हाला जलसंधारणाची सविस्तर माहिती व ज्ञान मिळून आम्ही प्रशिक्षित झाल्यामुळे आमचे गाव पाणीदार करण्यासाठी आम्ही सज्ज झालो आल्याची भावना नरखेड तालुक्यातील प्रशिक्षणार्थ्यांनी प्रसिध्द अभिनेते आमीर खान यांच्या वाढदिवसा निमित्य बोलताना व्यक्त केली व त्यांनी श्रमदानाच्या माध्यमातून शोषखड्डा तयार करून आमीर खान यांचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा केला .

प्रशिक्षणार्थ्यांनी आमीर खान यांनी राज्यात पाणी फाउंडेशनच्या कामाची सुरुवात राज्यात सुरू केल्यामुळ मोठ्या प्रमाणात होत असलेल्या जलसंधारणाच्या कामाबाबत व लोकांचे मनसंधारण होऊन लोकचळवळ मोठ्या प्रमाणात निर्माण होऊन लोकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याबाबत समाधान व्यक्त केले़ जात आहे .

वरुड तालुक्यातील करजगाव ट्रेनिंग सेंटर येथे नरखेड तालुक्यातील टीम , गव्हांनकुंड येथे आर्वी तालुक्यातिल टीम , सावंगा येथे देवडी तालुक्यातील टीम या तीनही प्रशिक्षण केंद्रावर पानि फाउंडेशन टीम कडुन व सर्व प्रशिक्षणार्थ्यांकडून आमिर खान यांचा जन्मदिवस आज आगळ्या वेगळ्या पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वरुड तालुक्यातील तीनही ट्रेनिंग सेंटरवर शोष खड्डे तयार करून आमिर खान यांच्या जन्म दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तसेच सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी आमिर खान यांना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करून सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी पाणीदार व्यक्तीमत्वाला जन्मदिवसाच्या आभाळभर पानीदार शुभेच्छा दिल्या त्यावेळी करजगाव सेंटरवर पाणी फाउंडेशन चे तालुका समन्वयक रुपेश वाळके , विदर्भ माष्टर ट्रेनर सुमित गोरले , प्रशिक्षक शिवहरी टेके , दयाल भादे , मारोती चौरे , दीक्षा शेवाळे , दीपक परस्कर , संदीप बहुरूपी , टीना ठाणेकर , व पूर्ण करजगाव टीम , तसेच गव्हांनकुंड सेंटर वर प्रवीण सर तालुका समन्वयक , सीमाताई ताकसांडे , प्रवीण बागडे , नयन गावंडे , हर्षल कराळे , गोविंद अडगळे , गजानन आवटे , बालिताई इंगोले ,अक्षय सर्याम अनिल वाघ , तसेच सवंगा सेंटर वर ज्योती म्याडम तालुका समन्वयक , गजभिये सर , अजित दंभाळे , पुष्पा नागले , अर्जुन बिसंदरे , हरिदास महाजन , नांदुभाऊ यांच्या सह पाणी फाउंडेशनची सर्व टीम उपस्थित होती !