*दंगलीला चिथावणी देणारे जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद नव्हे; तर शिवप्रेमी मिलिंद एकबोटे दंगलीचे सूत्रधार ठरवणे हीच का ‘शिवशाही’ ?* –  श्री. सुनील घनवट  (हिंदु जनजागृती समिती)

0
989
Google search engine
Google search engine

 

मुंबई :-

कोरेगाव-भीमा दंगलीला चिथावणी देणारे गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी आणि ‘भारत तेरे टुकडे होंगे’च्या घोषणा देणारा देशद्रोही उमर खालिद यांच्यावर गुन्हे दाखल असतांनाही त्यांना अटक न करता समस्त हिंदु आघाडीचे अध्यक्ष श्री. मिलिंद एकबोटे यांना अटक करण्यात महाराष्ट्र शासनाने धन्यता मानली, हे खेदजनक आहे. तसेच कोरेगाव-भीमा दंगलीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र असलेले जॅकेट घातले म्हणून राहुल पठांगडे या युवकाची ठेचून हत्या करणार्‍यांना शिक्षा तर सोडाच; पण आजवर अटकही झालेली नाही, हे ‘शिवशाही’ म्हणवणार्‍या राज्यकर्त्यांसाठी लज्जास्पद आहे. कोरेगाव-भीमा घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात जातीय दंगली पेटवण्यासाठी कारणीभूत असणार्‍या हजारांहून अधिक दंगलखोर हे राज्यकर्त्यांना गुन्हेगार वाटत नाहीत आणि ते त्यांच्यावर नोंदवलेले गुन्हे मागे घेतात, ही महाराष्ट्राच्या कायदा-सुवस्थेशी केलेली प्रतारणा आहे, अशी परखड भूमिका हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी या प्रकरणी मांडली आहे.

सरकारच्या अशा भूमिकेमुळे उद्या कोणीही जातीय कारणांचा वापर करून दंगली भडकवत महाराष्ट्र बंद करावा, राज्यातील जनतेला वेठीस धरावे आणि स्वतःचे राजकीय स्वार्थ साधावेत, ही दंगलखोरांच्या नेत्यांची मानसिकता आणखी बळावेल, यात शंका नाही. दंगलखोरांनी ‘श्रीराम’, ‘छत्रपती’ आदी हिंदुत्वाशी निगडीत नावे असलेल्या दुकानांना लक्ष्य केले, श्री गणेशमूर्तीची विटंबना आणि मंदिराची तोडफोड केली, तरी राज्यकर्त्यांना दंगलखोरांचा पुळका येतो आणि कोणीतरी तक्रार दिल्यामुळे शिवछत्रपतींच्या कार्याला वाहून घेणारे पू. भिडेगुरुजी आणि शिवप्रेमी श्री. मिलींद एकबोटे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात शासनाला धन्यता वाटते. यातच राज्य शासनाच्या बोटचेप्या धोरणाचे प्रतिबिंब दिसते. राज्यकर्त्यांची ही भूमिका बहुसंख्याक हिंदूंचे मन विषन्न करणारी आहे. यापुढे राज्यात शांतता नांदण्यासाठी शासनाने दंगलीला चिथावणी देणार्‍या आणि दंगल करणार्‍या सर्वांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही श्री. घनवट यांनी केली आहे.

हिंदूंच्या मतावर निवडून आलेल्या सरकारच्या कार्यकाळात हिंदु राष्ट्र सेनेचे अध्यक्ष श्री. धनंजय देसाई, हिंदु जनजागृती समितीचे डॉ. वीरेंद्रसिंह तावडे आणि आता श्री. मिलिंद एकबोटे हे निष्पाप हिंदु नेते कारागृहात असणे, हे हिंदु समाजाला अस्वस्थ करणारे आहे. याची उत्तरे मुख्यमंत्री देतील का, असा प्रश्‍नही हिंदु जनजागृती समितीने केला आहे.