*उद्या मोर्शी येथे पिक कर्ज मेळावा व कर्जमाफी संदर्भात मार्गदर्शन – शेतकऱ्यांना खरीप पिक पेरणीकरिता तातडीने कर्ज पुरवठा करण्याकरिता*

0
859
Google search engine
Google search engine

मोर्शी :- शेतक-यांना सुलभ पिक कर्ज वाटप सन २०१८ खरीप पिक पेरणीकरिता बँकाकडून तातडीने कर्ज (पतपुरवठा) करून देण्यासाठी पिक कर्ज अभियान राबविण्याबाबत वरुड मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ अनिल बोंडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून पिक कर्ज मेळावा व कर्जमाफी संदर्भात मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आलेला आहे.तालुक्यात पीक कर्ज वाटप सुलभ करण्यासाठी एकाचवेळी व एकाच दिवशी तालुका स्तरावर महापीक कर्ज वाटप मेळावा आयोजित करण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी यांच्या सुचनेवरुन प्रशासनामार्फत सुलभ पीक कर्ज अभियान- २०१८ शुक्रवार *दिनांक 15 जून २०१८ रोजी दुपारी १ वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृह, मोर्शी* येथे कर्जवाटप मेळावा व कर्जमाफी संदर्भात मार्गदर्शन याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यामध्ये गरजु व पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या गावाशी संबंधित अथवा त्यांची इच्छा असलेल्या इतर बँकांकडे कर्ज वाटपासाठी आवश्यक असणाऱ्या ७/१२ उतारा, ८-अ,हैसीयत दाखला, चतुसिमा नकाशा, फेरफार इत्यादी महसुली दस्ताऐवज संबंधित गावकामगार तलाठी यांचेकडून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच संबंधित शेतकऱ्यास जिल्हा मध्यवर्ती बँक, विविध कार्यकारी सहकारी संस्थांकडून कर्ज व थकबाकी नसल्याबाबत व व्यापारी बँकेकडून कर्ज पुरवठा घेण्यास ना-हरकत दाखला उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. मेळावा संबंधित बँकांनी त्यांच्या धोरणानुसार पीक कर्ज मंजूर करण्याबाबत कार्यवाही करावी व अशा कर्जदारांना तातडीने कर्ज उपलब्ध करून देण्याच्या शासनाकडून सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अंतर्गत शेतक-यांना झालेल्या कर्जमाफी संदर्भात काही संभ्रम किंवा तक्रारी असल्यास या मेळाव्याला उपस्थित राहून आपल्या तक्रारी मांडाव्यात. सर्व शेतकरी बांधवानी या पिक कर्ज मेळावा व कर्जमाफी संदर्भात मार्गदर्शनाला उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टी मोर्शी तर्फे करण्यात आलेले आहे.