तेलंगणा राज्यातील घरफोडीचा संशयित आरोपी अकोट शहर पोलिसांच्या जाळ्यात

0
1481
Google search engine
Google search engine

 

 

आकोट- तेलंगणा राज्यातील एक संशयित आरोपी अकोट शहरात असल्याची माहीती शहर पोलीसांना मिळाली असता तपास मोहीम राबवत त्यास पोलीसांनी जेरबंद करुन तेलंगाणा पोलीसांना सुपुर्द केले.पोलीस सुञांननुसार तेलंगाणा राज्यातील सिद्धीपेठ शहरा मध्ये 21।6।18 रोजी घरफोडी होऊन त्या मध्ये लाखो रुपयांचे दागिने व रोकड चोरांनी लंपास केली होती, सदर घरफोडीचा तपास सिद्धीपेठ सिटी पोलिस स्टेशन चे पोलिस उपनिरीक्षक एम. राजेंद्रप्रसाद हे करीत होते, त्यांना माहिती मिळाली होती की सदर घरफोडी शी संबंध असण्याची शक्यता असलेला एक संशयित अकोट शहरा मध्ये आहे, त्या वरून सिद्धीपेठ सिटी पोलीस स्टेशन चे पोलिस उपनिरिक्षक एम राजेंद्रप्रसाद, पोलिस कॉन्स्टेबल रामजी, पोलिस कॉन्स्टेबल सीताराम ह्यांचे पथक अकोट येथे आले व त्यांनी पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांना भेटून मदत करण्याची विनंती केली, पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक एम राकेश कला सागर ह्यांची परवानगी घेऊन सदर आरोपी चे शोध कामी एक पथक तयार करून अकोट शहरा मध्ये त्याचा शोध घेऊन 1 तासा मध्येच संशयित महेश तिरुमला उर्फ त्रिगे ह्याला ताब्यात घेऊन त्याची पडताळणी केली असता, सदर संशयित हा एका गुन्ह्या मध्ये सिद्धीपेठ तेलंगणा येथे कारागृहात असतांना त्याची अकोट तालुक्यातील जितेंद्र चव्हाण रा, उमरा ह्याचे सोबत ओळख झाली, तो सुद्धा एका गुन्ह्या मध्ये नमूद कारागृहात होता, महेश तिरुमला ह्याने जितेंद्र चव्हाण ह्याचे सोबत ओळख वाढवून त्याचा मोबाइल क्रमांक मिळवून त्याचा भाऊ अजय चव्हाण ह्याचे सोबत ओळख वाढवून त्याचे ओळखी वरून अकोट येथे येऊन राहत होता व अधून मधून तेलंगणा राज्यात जात येत होता, अकोट शहर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन प्रथम त्याची कसून चौकशी करून पुढील तपास कामी त्याला तेलंगाणा पोलिसांच्या ताब्यात दिले, सदर कार्यवाही पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे जितेंद्र कातखेडे, राहुल वाघ, नासिर शेख, मंगेश खेडकर,संतोष गावंडे ह्यांनी केली,