आकोट पालिकेची प्लास्टिक बंदी विरोधात बंपर कारवाई छापे टाकून केला२०हजार रु.दंड

0
1613
Google search engine
Google search engine

आकोट- आकोट नगर पालीकेच्या प्लास्टिक निर्मुलन पथकाने आज दि.25 ला विविध ठीकाणी छापे टाकुन प्लास्टिक वस्तु वापरणाऱ्यांना सुमारे २० हजार रुपये दंड केला.पालीकेच्या या धडक कारवाईने बंदी नंतरही प्लास्टिकच्या वस्तुंचा वापर करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.पालिकेच्या सुञांनी दिलेल्या माहीतीनुसार प्लास्टिकचा वापर करणाऱ्या ४ व्यापारी प्रतिष्ठानांवर छापा टाकुन थर्माकॉल द्रोण 14 कीलो.प्लास्टिक ग्लास 11 कीलो.प्लास्टिक कॕरी बॕग 3 कीलो.आदी प्रतिबंधीत प्लास्टिकचा माल मिळुन आला असता शासन अधीसुचनेप्रमाणे त्यांना प्रत्येकी 5 हजार रु.दंड करण्यात आला असुन कारवाईच्या पहील्याच दिवशी एकुण 20 हजार रुपयाची दंड वसुली करण्यात आली आहे.सदर कारवाई पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली रुपेश जोगदंड अग्नीशमन अधीकारी,चंदन चंडालीया आरोग्य निरिक्षक,वार्ड शिपाई शे.सलीम,सै.अन्सार सै.नजीर,सत्यनारायण सावरकर,पन्ना कालोचे,प्रकाश आठवले यांनी केली.दरम्यान पालीकेचे मुख्याधिकारी प्रशांत रोडे यांनी शहरातील सर्व नागरीकांना आवाहन केले आहे की महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या प्लास्टिक कॕरीबॕग,थर्माकॉल व त्यापासुन बनवण्यात आलेल्या वस्तु व साहीत्य वापर करु नये.सदर कारवाईने प्लास्टिक प्रतीबंधीत साहीत्यांचा वापर करणाऱ्यांना चांगलाच झटका बसला असुन पर्यावरण प्रेमी नागरीकांनी पालीकेच्या या कारवाईचे स्वागत केले आहे.मोठ्या शहरांनतर नगर पालीका स्तरावर कारवाई करणारी आकोट पालीका ही कदाचीत पहीली ठरली असावी असे दिसते आहे.