अमरावती – दर्यापूर मार्गावर भरधाव इंडिका कारची  व दुचाकीची समोरासमोर धडक – म्हैसपूर फाट्या जवळील घटना >< दुचाकी चालक गंभीर जखमी

0
898
Google search engine
Google search engine

ता.प्रतिनिधी / गजानन खोपे
भातकुली :-

अमरावती -दर्यापूर मार्गावर इंडिकाकारची दुचाकीला समोरासमोर जबर धडकेत दुचाकी सवार गंभीर जख्मी झाला आहे, दुचाकीचालक खोलापुर येथे काही कामानिमित्त गेला होता ,खोलापुर वरून म्हैसपूर गावाकडे परत येत असताना रस्त्याच्या मधोमध एक बाबूळचे झाड कोसळले असलेल्या मुळे भरधाव इंडिका कारने अमरावती वरून दर्यापूर कडे जात असताना , ६जुलै रोजी रात्री ७.३० वाजता च्या सुमारास म्हैसपूर फाट्यावर वरून १०० मीटर अंतरावर ही घटना घडली.

तात्काळ इंडिका कार चालक याने खोलापुर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली , तसेच घटनेची माहिती पोलिसांना सांगितली , तसेच शाम अरूण तायडे, वय ३० रा .माटरगांव इंडिका कार चालकाचे असे नाव आहे , दुचाकी चालक बाबुलाल ढोके, वय३५वर्षे रा म्हैसपूर , असे जखमी इसमाचे नाव आहे,जखमी ला अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात येथे हलविण्यात आले, तसेच या मार्गावर गेल्या दोन दिवसापासून बाबूळचे झाड कोसळले असुन सूध्दा सर्वजानिक बाधकाम विभागाने कोसळले झाड रस्त्याच्याबाजूला केले नाही जर ते झाड संबंधित विभागाने बाजूला असते तर हा आपघात टळला असता,या अपघाताला सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार आहे असे स्थानिक नागरिक म्हणत होते खोलापुर पोलीस घटनास्थळी जाऊन पंचनामा केला, ठाणेदार विजय शिगाळे यांच्या मार्गदर्शन खालील पी.एस.आय.खंडारे,वैध पुढील तपास करीत आहे,