गोरक्षक वैभव राऊत यांच्या समर्थनार्थ एकवटले २२ गावांतील ८०० ग्रामस्थ : १७ ऑगस्टला मूकमोर्चा !

0
852
Google search engine
Google search engine

रात सुईसुद्धा सापडली नसतांना पोलीस बॉम्ब सापडल्याचे खोटे सांगत आहेत ! – सौ. लक्ष्मी राऊत, वैभव राऊत यांच्या पत्नी

श्री. वैभव राऊत यांच्या पत्नीच्या या खुलाशावरून आतंकवादविरोधी पथकाच्या कारवाईवर जनतेने शंका उपस्थित केल्यास चूक ते काय ?

 

मुंबई – स्फोटके सापडल्याच्या तथाकथित प्रकरणाच्या आरोपाखाली आतंकवादविरोधी पथकाने अटक केलेले गोरक्षक श्री. वैभव राऊत यांच्या समर्थनासाठी १२ ऑगस्ट या दिवशी वसई तालुक्यातील शेकडो ग्रामस्थ त्यांच्या निवासस्थानी एकवटले. या वेळी २२ गावांतील ८०० हून अधिक ग्रामस्थांनी एकत्र येऊन श्री. वैभव राऊत यांना पाठिंबा घोषित केला. श्री. वैभव राऊत यांच्या अन्यायकारक अटकेच्या विरोधात ग्रामस्थांनी १७ ऑगस्ट या दिवशी मूक मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.श्री. वैभव राऊत यांच्या पत्नी सौ. लक्ष्मी राऊत यांनी त्यांच्या पतीच्या अटकेमागे ‘बीफमाफियां’चेच षड्यंत्र असल्याचा आरोप केला आहे.

सौ. राऊत म्हणाल्या, ‘‘कथित स्फोटाचा मागोवा घेत कुत्रा घरात आला नाही, तर पोलीसच त्याला खेचतच घेऊन आले. आमच्या घरात बॉम्ब ठेवले असल्याचा जावईशोध आतंकवादविरोधी पथकाने कुठून लावला ? पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात संपूर्ण घराची झाडाझडती घेऊनही सुईसुद्धा सापडली नाही. ८ गावठी बॉम्ब सापडले असल्याचे ते खोटे सांगत असून आमच्या कुटुंबाला अपकीर्त करण्यात येत आहे.

शेजारी असलेल्या साईदर्शन इमारतीमधील दुकानांतून स्फोटके सापडली, असे म्हणतात; मग ती जप्त करतांना श्री. वैभव राऊत यांना समवेत का नेले नाही ? ‘स्फोटके मिळाली’, असे सांगत खोल्या आणि पिशव्या वृत्तवाहिनीवरून दाखवल्या; मात्र त्यात खरोखरच स्फोटके आणि बॉम्ब होते का ?, याची शहानिशा का केली नाही ? त्या रात्री जो प्रकार झाला, त्यामुळे आमचे कुटुंब हादरून गेले आहे. १० ऑगस्ट या दिवशी सकाळी ७ वाजता पोलिसांनी घरातील सामान बाहेर काढले. समवेत प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधीसुद्धा होते. वैभव यांचा चेहरा झाकून पोलीस मुंबईत घेऊन गेले.’’