श्री रामेश्वर बरगट ” अकोला भूषण पुरस्काराने” सन्मानित

0
827
Google search engine
Google search engine

अकोला : संतोष विणके- दि १५ऑगस्ट २०१८ ला अकोला येथील वंदे मातरम संघटनेने विविध सामाजिक ,राष्ट्रीय कार्यात वाहून घेतले आहे.अश्या सामाजिक कार्यात आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारया व्यक्तीचा अकोला भूषण पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले, यामध्ये श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे अकोला येथील श्री रामेश्वर बरगट याना सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल ” अकोला भूषण पुरस्काराने ” अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे गृह राज्यमंत्री मा. डॉ रणजित पाटील यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व सन्मान चिन्ह तसेच प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.विशेष म्हणजे या कार्यक्रमात ७२ राष्ट्रध्वज फडकवत स्वतंत्रदिन साजरा करण्यात आला. ह्याप्रसंगी जिल्याचे जिल्हाधिकारी श्री आस्तिककुमार पांडेय, उपविभागीय अधिकारी श्री संजय खडसे ,खासदार श्री संजय धोत्रे,आमदार श्री गोवर्धन शर्मा, आमदार श्री रणधीर सावरकर, संस्थेचे अध्यक्ष उमेश मसने,उपाध्यक्ष प्रा डॉ संतोष हुसे व संघटनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.यावर गुरुदेव सेवा मंडळाचे श्री संतोष भोरे,प्रा हरिदास गाहूकर,श्रीपाद खेळकर,शिवाजी म्हैसने,तुषार बरगट,अनिकेत तायडे ,आकाश हरणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. संचालन व आभार श्री धनंजय मिश्रा यांनी केले