सनातनवरील बंदीविषयी पाठवलेला सुधारीत प्रस्ताव केंद्राकडे पडून आहे ! – गृहराज्यमंत्री दीपक केसरकर

0
1457
Google search engine
Google search engine

मुंबई – सनातनवर बंदी आणण्याविषयी केंद्राकडे पाठवलेल्या आधीच्या (तत्कालीन काँग्रेस  सरकारने पाठवलेल्या) प्रस्तावात चुका होत्या. त्या चुका सुधारून बंदीविषयीचा सुधारीत प्रस्ताव मागेच पाठवला आहे; मात्र तो केंद्र सरकारकडे पडून आहे. शेवटी सर्व वस्तूस्थितीचा अभ्यास करून केंद्रशासनाने याचा निर्णय घ्यायचा असतो, अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री तथा शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराला दिली.