प्रतिबंधीत चायना मांजा विक्री करणाऱ्यांवर आकोट शहर पोलीसांचा छापा; दोघांवर गुन्हे दाखल

0
720
Google search engine
Google search engine

अकोट/प्रतीनिधी – शहर पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी राज्य शासनाने प्रतिबंधित केलेला चायना मांजा विकणाऱ्या दोघांवर रेड करुन 2,500/- रु चा चायना मांजा जप्त केला
दि 10/09/18 रोजी मिळालेल्या गुप्त बातमी वरुन गाजी प्लॉट अकोट येथे फिरोज खा इस्लाम खा वय 41 वर्ष रा गाजी प्लॉट अकोट याचे किराणा दुकान मध्ये रेड केली असता. त्यांचे जवळ दुकानात चायना मांजा कि 1,500/- रु चा मिळुन आला तसेच इफ्तेखार प्लॉट अकोट येथे इरफान खा अहमद खा वय 32 रा ईफ्तेखार प्लॉट अकोट येथे त्यांचे स्टेशनरी दुकानात रेड केली असता त्यांचे जवळ दुकानात चायना मांजा की 1,000/- रु चा मिळुन आला प्रतिबंधीत चायना मांजा हा त्यांनी आपले फायद्यासाठी दुकानात विक्री साठी ठेवला असल्याने त्यांचे विरुध्द कलम 290 भा द वि प्रमाणे गुन्हे दाखल केले सदर कारवाही पो नि गजानन शेळके साहेब यांचे मार्गदर्शनाखाली डी बी पथकचे स पो नि ज्ञानोबा फड पोउपनी महेंद्र गवई पोहेका संजय घायल नापोका राकेश राठी गोपाल अघडते पो का सुलतान पठाण विजय सोळंके यांनी केली