राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या सक्षणा सलगर यांच्याशी भाजपा तालुका अध्यक्षाचे असभ्य वर्तन

0
3008
Google search engine
Google search engine

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या सक्षणा सलगर यांच्याशी भाजपा तालुका अध्यक्षाचे असभ्य वर्तन

उस्मानाबाद – मागील दीड दोन महिन्यांपासून पावसाने पाठ फिरवली असताना, टाकळी (बें) युवकांनी काही दिवसांपूर्वी पीक पंचनामे व्हावे, विमा भेटवा, अनुदान मिळावे म्हणून सोशल मीडियाच्या माध्यमातून तहसीलदार , मंडळ अधिकारी जिल्हाधिकारी यांच्या कडे विषय लावून धरला होता, म्हणून आज आमच्या प्रयत्नामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या सक्षणा सलगर यांनी पीक पाहणी व पंचनामे व्हावे म्हणून तहसीलदार श्रीमती लोखंडे
मॅडम यांना आमंत्रित केले होते, मात्र यातून टाकळी तील सर्व नागरिकांना विमा अनुदान भेटेल आणि याचे सर्व श्रेय खटाटोप केलेल्या युवकांना आणि सलगर यांना भेटेल म्हणून , सक्षणा सलगर यांनी भाजप सरकारच्या विरोधात केलेल्या शब्दला धरून भाजपा तालुका अध्यक्ष यांनी गोंधळ घातला, पंचनामे करू दिले नाहीत त्यामुळे तहसीलदार तलाठी यांनी काढता पाय घेतला,आणि नंतर सक्षणा सलगर यांनी गावातील कामे घेता अर्धवट कामे करता, तेरणा नदीवरील पुलावर कामाचे पिचिंग काम का केलं नाही असा प्रश्न केला असता सलगर यांच्या वडीलच्या पूर्वी करत असलेल्या गुत्तेदारी बद्दल अपशब्द काढून असभ्य वर्तन केले आणि हुज्जत घातली व सक्षेणा सलगर यांना एकेरी बोलल्याची माहिती सक्षेणा सलगर यांनी आमच्याशी प्रतिनीधीशी बोलताना सांगीतले