नागरिकांचे अतिक्रमण नियमाकुल करा अन्यथा अन्नत्याग आंदोलन ला नगरसेवक सचिन खुळे सुरू मोठया संख्येने स्थानिक चांदुर बाजार येथील रहिवासी आणि प्रहार कार्यकर्ते उपस्थिती

0
1795
Google search engine
Google search engine

नागरिकांचे अतिक्रमण नियमाकुल करा अन्यथा अन्नत्याग आंदोलन ला नगरसेवक सचिन खुळे सुरू
मोठया संख्येने स्थानिक चांदुर बाजार येथील रहिवासी आणि प्रहार कार्यकर्ते उपस्थिती

चांदूर बाजार :-बादल डकरे

शहरातील नागरिकांचे घराच्या जागेचे सन 1995 पूर्वीचे अतिक्रमण नियमाकुल करण्याकरिता प्रस्ताव सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमरावती यांनी दिले होते. मात्र वर्ष लोटूनही अद्यापपर्यंत शहरातील नागरिकांचे अतिक्रमण नियमाकुल करण्यात आले नाही. यामुळे 4 ऑक्टोंबर पर्यंत हे अतिक्रमण नियमाकुल न झाल्याने पालिका कार्यालयासमोर च अन्नत्याग आंदोलन प्रहारचे स्वीकृत सदस्य सचिन खुळे यांनी सुरू केले आहे.
सण 1995 पूर्वीचे चांदूरबाजार शहरातील नागरिकांच्या घराच्या जागेचे अतिक्रमण नियमाकुल करण्याकरिता स्थानिक प्रहरच्या नगरसेवकांनी शहरातील जयस्तंभ चौक येथे उपोषण केले होते. या उपोषणातील मुख्य मागणी ची दखल घेत 10 नोव्हेंबर 2017 रोजी जिल्हाधिकारी अमरावती व आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी तत्कालीन मुख्याधिकारी नगरपरिषद चांदूरबाजार यांना 1995 पूर्वीच्या शहरातील नागरिकांच्या घराचे अतिक्रमण नियमाकुल करण्याकरिता प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र तरीही वर्षलोटून ही अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. असा आरोप स्वीकृत सदस्य सचिन खुळे यांनी मूख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केला होता.
स्थानिक नगर पालिकेवर भाजप ची एक हाती सत्ता असून विरोधी पक्षात असलेले प्रहार च्या नगरसेवकांना हेतूपुरस्पर डावलले जात असल्याचा आरोप ही नगरसेवक सचिन खुळे यांनी केला आहे. या सोबतच 4 ऑक्टोंबर 2018 पर्यंत सन 1995 पूर्वीचे चांदूरबाजार शहरातील अतिक्रमण नियमकुल करून जागेचे पट्टे लाभार्थ्यांना वाटप न झाल्याने नगर परिषद कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन प्रहार कार्यकर्ते यांच्या उपस्थित नगरसेवक खुळे यांनी सुरू केले आहे.

त्यामुळे भाजपा शासित नगरपालिका प्रशासन या आंदोलक इशाऱ्यावर काय भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

यावेळी सरदार खा सहदत खा गटनेता तथा नगरसेवक, शिशीर माकोडे (श.अ. प्र. शे.स.),गणेश पुरोहित सचिव महाराष्ट्र राज्य प्रहार,ऋषिकेश खोडपे रुग्णसेवक,रहमान भाई माजी नगराध्यक्ष, मुज्जफर हुसेन माजी उपाध्यक्ष, नितीन कोरडे नगरसेवक,वैशालीताई खोडपे,उषाताई माकोडे,सलीम सरकत,बाळासाहेब वाकोडे,राजू पठाण, सुरेश नाकाडे,
या उपोषण ठिकाणी प्रहार पदाधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते.