शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसणार ; देवदत्त मोरे यांची उस्मानाबादेत दुष्काळी परिषदेत घोषणा

0
803
Google search engine
Google search engine

शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसणार देवदत्त मोरे यांची दुष्काळी परिषदेत घोषणा

उस्मानाबाद – उस्मानाबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य ग्रहात दुष्काळी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या परिषदेसाठी देवदत्त मोरे यांनी पुढाकार घेतला होता तालुक्यातील कसबे तडवळे येथील देवदत्त मोरे यांनी देवदेवतांची मंदिरे ,शिखर बांधकाम सामाजिक कार्यासाठी बराच खर्च केला आहे, पण यापुढे दुष्काळी भागातील शेतकर्यांची कामे करणार असल्याचे मत देवदत्त मोरे फाउँडेशनचे संस्थापक अध्यक्ष देवदत्त मोरे यांनी व्यक्त केले. तर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी राज्यात दररोज डझनभर आत्महत्या होत आहेत याला आपण निवडून दिलेले खासदार आणि आमदारच जबाबदार असल्याचा आरोप केला. शेतकरी आत्महत्यांचा कलंक पुसण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या दुष्काळी परिषदेत ते बोलत होते.शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसण्यासाठी शुक्रवारी (दि२६) देवदत्त मोरे फाऊंडेशन आणि शेतकरी संघटनेच्या वतीने उस्मानाबाद येथे भव्य शेतकरी मेळावा आणि दुष्काळी परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत शेतकऱ्यांची सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती व वीजबिल माफी झाली पाहिजे ,शेतीमालाला उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा मिळालाच पाहिजे, सर्व शेती मालावरील निर्यात बंदी कायमची उठवावी, शासनाने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा कमी भाव मिळाला म्हणून फरकाची रक्कम सरकारने दिली पाहिजे, उसाला पहिली उचल ३हजार ५००रुपये द्यावी., जिल्ह्यात दुष्काळ घोषित करण्यात यावा व दुष्काळाचा समावेश आपत्ती निवारण कायद्यात करून त्याप्रमाणे मदत मिळावी आणि पशुधनासाठी चारा व पाण्याची व्यवस्था छावणीला न करता दावणीला केली पाहिजे या प्रमुख मागण्या या परिषदेत करण्यात आल्या.यावेळी बोलताना देवदत्त मोरे यांनी निवडणूक काळात हातापाया पडून मत मागणारी नेते मंडळी निवडणुकीनंतर विकासकामासाठी काहीही ठोस कार्य करत नसल्यानेच जिल्ह्यावर दुष्काळी जिल्हा हा शिक्का पडल्याचे सांगितले . मेक इन इंडियाच्या नावाखाली सरकारकडून शेतकऱ्यांच्या घरावर नांगर फिरवला जात आहे , मी सुद्धा शेतकरी कुटुंबातला आहे त्यामुळे यापुढे शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल याशिवाय प्रसंगी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर यायला देखील तयार राहणार असल्याचे सांगितले.रघुनाथदादा पाटील यांनी परिषदेत बोलताना सांगितले की राज्यात दररोज शेतकऱ्यांच्या डझनभर आत्महत्या होतात याला आपण निवडून दिलेले खासदार आणि आमदार जबाबदार असल्याचा आरोप केला .पैसा असणारे अनेक जण आहेत त्यात कोणी साई मंदिरात, कोणी बालाजी मंदिरात ,कोणी अन्य देव देवळात पैसा खर्च करतो पण देवदत्त मोरे यांनी आपले द्रव्य शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे केले आहे.त्यासाठी त्यांचा गौरव करायला पाहिजे असे मत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर कालिदास आपेट पांडुरंग रायते प्रशांत भालशंकर ललिताताई खडके जगदीश गवळी शहाजी वाघ हरीश्चंद्र मगर राजकुमार सस्तापुरे निळकंठ शिंदे उदय साबळे अक्षय खडके,अर्चनाताई मोरे, पांडुरंग मारवडकर शरद शेळके औदुंबर धोंगडे, मिलिंद रोकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अरविंद घोडके यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे दुःख आणि वेदना मांडल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संदीप इंगळे शरद शेळके अक्षय पडवळ, धनंजय जोशी बंटी मुंडे श्रीराम बापू सूर्यवंशी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व देवदत्त मोरे फाऊंडेशनचे सदस्य यांनी परिश्रम घेतले