मुस्लिम नाही तर ओबीसी म्हणून आरक्षण द्या  – शब्बीर अन्सारी >< माजी मंत्री नसीम खान यांना शब्बीर अन्सारी यांचे प्रत्युत्तर 

0
784
Google search engine
Google search engine

मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ) – मराठा आरक्षण नंतर मुस्लिम आरक्षण चा मुद्दा समोर येत आहे अश्यात मुस्लिम म्हणून द्या, ओबीसी म्हणून देऊ नये या माजी मंत्री नसीम खान यांनी केलेल्या वक्तव्यावर ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्ग. चे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.


यावेळी अन्सारी म्हणाले की, गेली 40-50 वर्षांपासून आम्ही मुस्लिम समाजासाठी काम करतोय. मागासवर्गीय आयोगाकडे गेलो, अनेक वेळा न्यायलयात गेलो, तुरुंगात गेलो, संपूर्ण देश पिंजून काढला. मुस्लिम समाजाच्या हिताचे परिपत्रक, आदेश तसेच शासन निर्णय घेण्यास शासनास त्याकाळी भाग पडले त्यामुळे आज कुठे ना कुठे समाज मुख्य प्रवाहात येताना दिसत आहे. पण हे काही लोक ज्यांना मुस्लिम समाजाची काहीच माहिती नाही. ते आरक्षणाची चुकीची मागणी किंवा वक्तव करतात हे योग्य नाही. शासनाकडून मुस्लिम आरक्षणासाठी आता पुन्हा मागासवर्गीय आयोग कडे जावे लागेल अशी चर्चा होताना दिसते. असे झाले तर आम्ही न्यायलयात दाद मागू ! अश्या तीव्र शब्दात अन्सारी यांनी आपली नाराजगी व्यक्त केली आहे. मुस्लिम म्हणून आम्हाला आरक्षण नको, तर ओबीसी म्हणून आम्हाला आरक्षण हवे आहे. त्यात पण मुस्लिम ओबीसी म्हणून आरक्षण नको आहे. ज्या प्रमाणे इतर जातींना प्रवर्ग म्हणून आरक्षण दिले जाते. त्याप्रमाणे मुस्लिमांना सुद्धा प्रवर्ग म्हणून आरक्षण मिळणे पाहिजे. मुस्लिम आरक्षण म्हणजे काय ? आमच्या धर्माचे नाव का घेता ? असा प्रश्न अन्सारी यांनी उपस्थित करत हि बाब असंविधानिक आहे असे प्रखर मत त्यांनी व्यक्त केले. मुस्लिम ओबीसी म्हणू नये म्हणून त्यासंदर्भात मुस्लिम हा शब्द वगळण्यात आला आहे त्याबाबत शासन निर्णय आहे. आम्हाला ओबीसी म्हणा असे अन्सारी यांनी सांगितले.

तसेच मुस्लिम समाजाला ओबीसी प्रवर्ग म्हणून आरक्षण आहे ते तसेच राहावे व आहे तसेच दिले गेले पाहिजे यासाठी आवश्यक पडल्यास ओबीसी आंदोलन करू असे ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्ग. चे मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी यांनी सांगितले.