ठाणेदार गजानन शेळके यांनी स्वीकारला बाळापुर पोलीस स्टेशनचा पदभार

0
761
Google search engine
Google search engine

अकोला:बाळापुर पोलीस स्टेशनचे नवीन ठाणेदार गजानन शेळके यांनी काल दिनांक 30 नोव्हे.ला बाळापुर पोलीस स्टेशन येथे ठाणेदार पदाचा पदभार स्विकारला. यावेळी बाळापुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद ठाकरे यांना निरोप देण्यात आला.तर नुतन ठाणेदार गजानन शेळके यांचं स्वागत करण्यात आले.यावेळी ठाणेदार गजानन शेळके यांनी बाळापुर शहर तथा ग्रामीणमध्ये पोलिस व जनता यांचं संबध दृढ करण्यासोबतच कायदा व सुव्यवस्था राबवणार असल्याचं सांगितलं जेणेकरून शहर तथा गाव पातळीवरील पोलीसांचा जनतेशी योग्य समन्वय राखल्या जाईल.ठाणेदार गजानन शेळके यापुर्वी आकोट शहर पोलीस स्टेशनला ठाणेदार होते.

अवघ्या १४ महीन्याच्या कार्यकाळात प्रभावी कामगीरी करत त्यांनी आकोटवासियांचा विश्वास जिंकला होता.संवेदनशिल शहर म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या आकोट शहरातील विविध सण उत्सव मिरवणुका ठाणेदार शेळके यांनी शांततेत पार पाडण्यासाठी मेहनत घेतली.त्यांच्या अल्पावधीतील बदली ही आकोट वासियांना आश्चर्यचकित करणारी होती.