बचपन प्ले स्कुलमध्ये ‘गोवर – रूबेला’ लसीकरण

0
1323
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
    शहरातील बचपन प्ले स्कुलमध्ये ‘गोवर-रूबेला’ लसीकरण मोहीम शुक्रवारी राबविण्यात आली. यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना ‘गोवर – रूबेला’ ची लस देण्यात आली. लसीकरणानंतर बालकांना कुठलाही त्रास झाला नाही.
     यावेळी स्थानिक ग्रामिण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मरसकोल्हे यांनी उपस्थित पालकांना गोवर रूबेला आजारांची सविस्तर माहिती दिली. या लसीकरण कार्यक्रमाला डॉ. तारे, डॉ. डांगे, श्रीमती धुर्वे, श्रीमती गायकवाड, श्री. सोळंके, शोऐब अहेमद आदी अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता संचालिका मिनाक्षी रॉय यांच्यासह शिक्षकवृंदानी परिश्रम घेतले