मराठा आरक्षण मिळाल्याबद्दल चांदूर रेल्वेत जल्लोष – फटाके फोडुन वाटली मिठाई

0
796
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान )
मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतचा मागासवर्ग आयोगाच्या अहवालावरील सरकारचा कृती अहवाल विधानसभेत गुरुवारी सादर करण्यात आला होता. या अहवालातून मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मिळाले. आरक्षण मिळाल्याबद्दल स्थानिक मराठा समाजाच्या वतीने गुरूवारी सायंकाळी जल्लोष करण्यात आला.
मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मिळाल्याबद्दल स्थानिक शिवाजी नगर परिसरात ढोल-ताशे वाजवुन फटाके फोडुन जल्लोष साजरा करण्यात आला. यानंतर मिठाईचे सुध्दा वाटप करण्यात आले. अनेक मोर्चांच्या माध्यमातुन सरकारने आरक्षणाची मागणी मंजुर केल्यामुळे आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी अनेक मराठा समाज बांधव उपस्थित होते.
मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळाल्यामुळे आंदोलनात सहभागी व या दरम्यान हुतात्मा झालेल्यांना न्याय मिळाला. यामुळे मुख्यमंत्री यांचे जाहीर आभार..  
– सौ. दिपाली विजय मिसाळ 
नगरसेविका, न.प. चांदूर रेल्वे….