पोलीस उदय दिवस व रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्ताने आॕटो व वाहन चालकांना मार्गदर्शन

135

आकोट/ प्रतीनिधी

आकोट शहर पोलीस स्टेशन येथे पोलीस उदय दिवस व रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्ताने अकोट शहरातील आटो व वाहन चालकांनाआज दि.7 जाने.ला मार्गदर्शन करण्यात आले.रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्याने घेण्यात आलेल्या या सभेत रहदारी नियमाचे पालन कसे करावे ,लायसन्स असेल तरच वाहन चालावावे तसेच रस्त्याने काही अनुचित प्रकार दिसला तर लगेच पोलिसांना कळवावे जेणे करून पोलीस व जनता यामधील संबंध वृद्धिंगत होण्यास मदत होईल. अशा विविध सुचना पर मार्गदर्शनपर करण्यात आले.

तसेच वाहतुक नियमांबाबत वाहन चालकांना समजावून सांगण्यात आले.. उपस्थीतांना यावेळी उपविभागीय पो.अधिकारी सुनिल सोनवणे यांच्या मार्गदर्षनाखाली अकोट शहर ठाणेदार
संतोष महल्ले यांनी माहीती दिली.यावेळी वाहतूक शाखेचे पोहेका जगदिपसिंग ठाकूर मेजर पोहेकॉ शिरसाठ मेजर पॉको गणेश फोकमारे पॉको अनिल लापुरकर व गोपनीय शाखेचे asi रणजित खेडकर हे उपस्थित होते.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।