ऊस बिलासाठी शेतकर्यांचा कारखान्याचा गव्हाणीत उड्या मारण्याचा प्रयत्न ; शिला अतुल कारखाना नितळी येथील घटना

521

२०१४-१५ सालीच्या गळीत हंगामातील थकीत ऊस बीलासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन.
जयलक्ष्मी शुगर्स लि.नितळी येथील प्रकार.

उस्मानाबाद / प्रतिनिधी – उस्मानाबाद तालुक्यातील सध्या नाव बदललेला साखर कारखाना शिला अतुल शुगर्स लि.नितळी या कारखान्याचा २०१४-१५ ला झालेल्या गळीत हंगामात गाळप झालेल्या ऊसाचे शेतकऱ्यांचे ऊसबील द्यावे या मागणीसाठी शेतकऱ्यांनी गव्हाणीत उतरुन आंदोलन करण्याचा प्रयत्न केला.
धर्मराज वामनराव साळुंके रा.चिंचोली (काजळे) ता.औसा जि.लातुर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.सकाळी ११ पासुनच औसा तालुक्यातील हिप्परगा (कवळी),नांदुर्गा(देशमुख),एकंबी,टाका-मासुर्डी,चिंचोली(काजळे) व कनगरा येथील शेतकरी कारखान्याच्या गेटवर जमली होती.गव्हाणीत उतरुन आंदोलन करुन कारखाना बंद पाडणार असे त्यांनी आगोदरच कारखाना व पोलीस प्रशासनास निवेदनाद्वारे शेतकऱ्यांनी कळवले होते.
कारखान्याचे संचालक मालक रोहितराज विजय दंडनाईक हे शेतकऱ्यांना गेटवरच सामोरे जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली.जानेवारी ३० पर्यंत सर्व शेतकऱ्यांची थकीत पैसे दिले जातील असे आश्वासन दिले.हा कारखाना नाशिक येथील शिला-अतुल शुगर टेक प्रा.लि.कंपनीस भाडेतत्वावर देण्यात आला असुन पूर्ण क्षमतेने चालत असुन या हंगामात गाळप केलेल्या ऊसास २००० रु.प्रतीटन भाव दिला आहे.व महिना अखेर सर्व शेतकऱ्यांचे थकीत पैसे दिले जातील असे आश्वाशीत केले.हे आंदोलन ११ ते दुपारी २ पर्यंत चालले.नंतर आंदोलन परत घेण्यात आले.साधारण ५० ते ६० शेतकऱ्यांनी या आंदोलनात भाग घेतला.
आंदोलनादरम्यान बेंबळी पोलीस स्टेशनचे सपोनि उत्तम जाधव व सात कर्मचारी उपस्थित असल्याने आंदोलन शांततेत झाले.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।