एसटीची भोडवाढ रद्द करा भाजपाचे आगार व्यवस्थापकांना निवेदन

157
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
उड्डाणपुलाच्या कामामुळे करण्यात आलेली भाडेवाढ रद्द करण्यात यावी अशी मागणी स्थानिक भाजपाच्या वतीने आगार व्यवस्थापकांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.
काही दिवसांपुर्वी उड्डानपुलाच्या कामामुळे अनेक ग्रामिण भागातील एसटीचे बस भाडे व विद्यार्थ्यांच्या मासिक पास दरामध्ये भरमसाठ वाढ करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या पास दरामध्ये वाढ झाल्याने विद्यार्थ्यांचे शहरात येऊन शिक्षण घेणे कठीण झाले आहे. त्यामुळे यावर तत्काळ तोडगा काढून ही भाडेवाढ रद्द करण्यात यावी अशी मागणी जिल्हा कार्यकारीणी सदस्य प्रमोद नागमोते, विनोद खोब्रागडे, वसंत खंडार, टिल्लु गणेडीवाल, बंडु भुते, अखिलेश चौधरी, संजय मोटवानी, विलास तांडेकर, अजय हजारे, गजानन यादव, सैय्यद जाकीरभाई, सौ. अपर्णा जगताप, विलास नांदुरकर, डॉ. सुषमा खंडार, नगरसेविका सुरेखा तांडेकर, सविता ठाकरे, शितल गायगाले, यांसह शाळेचे, महाविद्यालयाचे विद्यार्थी – विद्यार्थीनी उपस्थित होते.
जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।