वृत्तपत्र वितरक संजय कुळकर्णी यांना पितृशोक

0
703
Google search engine
Google search engine

अकोट/प्रतिनीधी-

दैनिक तरुण भारतचे अकोट वितरण प्रतिनिधी संजय कुळकर्णी यांचे वडिल कै.रामदास उपाख्य अविनाश माधव कुळकर्णी यांचे रविवार(ता.१३)ला सकाळी सहा वाजता निधन झाले.मृत्यूसमयी ते ८० वर्षांचे होते.गत एक वर्षापासून त्यांनी कर्करोगाशी लढा दिला.त्यानंतर आज त्यांची प्राणज्योत मावळली.

कै.रामदास कुळकर्णी हे प्रायमरी कन्झ्यूमर्स सोसायटी व अकोट दुध उत्पादक संघाचे माजी संचालक होते.त्यांनी१९८०च्या दशकात नगरपरिषदेची निवडणूकही लढवली होती.त्यांच्यावर दर्यापूर मार्गावरील हिंदू स्मशानभूमिवर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांना दोन मिनीटे मौन पाळून सामुहिक श्रध्दांजली वाहण्यात आली.अकोट तालुका वृत्तपत्र विक्रेता संघटना,अकोट तालुका पत्रकार संघ,अकोट नगर भाजपा,श्रीनाथ सखा वृंद,वैभव नागरी सहकारी पतसंस्था,श्री.सरस्वती शिक्षण संकुल,नवयुग वाचनालय,ब्राम्हण समाज, गोरक्षण समिती,अडत दुकान संघटना,गणेश उपासक मंडळ,परशुराम जयंती उत्सव समिती आदींकडून श्रध्दांजली वाहण्यात आली.कै.कुळकर्णी यांच्या मागे दोन मुले,तीन मुली व बराच मोठा आप्तपरिवार आहे.