उमरखेडच्या मुलांना मिळणार त्यांच्या शाळेचे हक्काचे छत – आ. डॉ. अनिल बोंडे यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध

0
1034
Google search engine
Google search engine

तब्बल ३९ लक्ष १२ हजार ५४४ रुपये मंजूर

अमरावती/मोर्शी :-

जून २०१८ महिन्यात जोरदार चक्रीवादळ आले होते. यामध्ये उमरखेड येथील शाळेचे छप्पर उडाले, भीती पडल्या, विद्यार्थी याना बसायला जागा नाही, आता करायचे तरी काय सर्व शिक्षकांच्या मागे विचार सुरु झाला. शाळेकरिता जिल्हा परिषद कडे निधी नाही, शेवटी आ. डॉ. अनिल बोंडे यांनी स्वतः शाळेची पाहणी करून या शाळेकरित निधी उपलब्ध करून देण्याचे वचन विद्यार्थांना दिले. व आता त्या शाळा बांधकामाला प्रारंभ झाला.

सन २०१८ मधील जून महिन्यामध्ये झालेल्या चक्रीवादळामुळे उमरखेड ता. मोर्शी येथील शाळेचे छत उडाले. व भीती सुद्धा कमजोर झाल्या, उमरखेड शाळेत वर्ग १ ते ७ असे वर्ग आहे. यात तब्बल ८० विद्यार्थी सख्या आहे. आता ह्या विद्यार्थांना बसवावे कुठे व शिकवावे कुठे हा विचार मुख्याधापिका सौ. अकर्ते याना पडला होता. त्यांनी जिल्हा परिषदकडे वारंवार पाठपुरावा केला. परंतु त्यातून त्यांना काहीही साध्य झाले नाही. शेवटी आ. डॉ. अनील बोंडे यांनी अचानक उमरखेड गावाला भेट दिली असता. हा प्रकार समोर आला. त्यावेळी आ. डॉ. बोंडे यांनी शाळेची पूर्ण पाहणी करून जिल्हा परिषदच्या अभियंता यांना बोलावून हि शाळा बांधण्याकरिता किती निधी लागेल त्याची रकम मला सांगा, व मी या शाळेला ती उपलब्ध करून देण्याचे वचन त्या शाळकरी मुलांना व गावकर्यांना दिले. व त्याची पूर्तता म्हणून आ. डॉ. बोंडे यांनी महारास्ट्र वने महामंडळ यांच्या कडून सी. एस. आर. निधी अंर्तगत तब्बल ३१ लक्ष ७२ हजार ५४४ रुपये व सर्व शिक्षा अभियान अंतर्गत ७ लक्ष ४० हजार असे एकून ३९ लक्ष १२ हजार ५४४ रुपये निधी करण्यात आ. डॉ. बोंडे यांना यश आले.

गेल्या काही महिन्याप्सून हि शाळा जेथे जागा मिळेल तेथे चालू होती, परंतु त्यांना त्यांच्या हक्काचे छत मिळणार आहे. त्याकरिता आ. डॉ. अनिल बोंडे यांनी रविवारी भूमिपूजन केले यावेळी जिल्हा परिषद सदस अनिल डबरासे, पंचायत समिती सद्यस माया वानखडे, शिक्षणाधिकारी श्री. तुरनकर, सौ. पवार, श्री. पुनसे, केन्द्र प्रमुख बडवाईक, अजय आगरकर, बाळूभाऊ मुरुमकर, मनोज माहुलकर, अश्पाक शहा, अनिल तायवाडे, साहेबराव वानखडे हे हजर होते. यावेळी आ. डॉ. अनिल बोंडे यांनी महाराष्ट्र वने महामंडळ च्या माध्यमातून मिळवून दिलेल्या निधीमुळे शाळेचे कायापालट होत आहे. त्याकरिता सार्वजनिक उपक्रम समिती, विधानमंडळ महारष्ट्र चे अध्यक्ष आ. डॉ. अनिल बोंडे, महाराष्ट्र वने महामंडळ चे व्यासाथापक श्री. राम बाबू व जिल्हा परिषद अमरावतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मनीषा खत्री यांचे जि. प. शाळा उमरखेड व्यवस्थापन समिती ताफे आभार व्यक्त होत आहे.