अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळांच्या कर्ज प्रकरणात बँकांची उदासीनता

0
588
Google search engine
Google search engine

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळांच्या कर्ज प्रकरणात बँकांची उदासीनता

उस्मानाबाद /प्रतिनिधी – अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यात 50 हजार मराठा तरुणांना कर्ज देण्याचा मानस आहे यामुळे मराठा समाजातील तरुणांना उद्योजक होण्याचा मान मिळणार आहे. तसेच उस्मानाबाद जिल्ह्यात पंधराशे कर्ज प्रकरणे देण्याचा उद्देश आहे .आतापर्यंत राज्यात 30 हजार मराठा बांधवांनी कर्जासाठी अर्ज दाखल केलेले आहेत त्यापैकी २ हजार अर्जदाराचे कर्ज मंजूर झालेले आहे .उस्मानाबाद जिल्ह्यतील ११४४ मराठा बांधवांनी कर्जासाठी अर्ज केले होते .५५ कर्ज मंजूर झालेली आहे महामंडळ हे बँकांना कर्ज व्याजाची हमी देणार आहे. महामंडळाचे ४०० कोटीचे बजेट आहे या कर्जासाठी कुठल्याही जामीनदाराची आवश्यकता नाही. आज उस्मानाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बँका व मराठा बांधवाची आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील व जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांना तात्काळ कर्ज मंजूर करण्याचे आदेश दिले या बैठकीत मराठा समाजाच्या तरुणांनी बँका कर्ज देत नाही बँका टाळाटाळ करतात , व्यवस्थापकाकडून पिळवणूक केली जाते अशा स्वरूपाचा सूर महामंडळाच्या अध्यक्षाकडे तरुणांनी तक्रारींचा पाढा वाचून दाखवला त्यामुळे अध्यक्षही चर्चामध्ये हतबल झालेले दिसत होते. एकंदरीत या बैठकीवरुन उस्मानाबाद जिल्ह्यातील फक्त 55 तरुणांना बँकांनी कर्ज दिलेले आहे याचा अर्थ असा होतो की काया महामंडळास कर्ज देण्यासाठी कानाडोळा करत असल्याचे दिसत आहे.
आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत मराठा समाजातील बांधवांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा सरकार राज्यातील ५० हजार जणाना मार्च पर्यंत दहा लाख रुपयांपर्यंत राष्ट्रीय आणि सहकारी बॅंकांकडून उपलब्ध करून देणार असून उस्मानाबाद जिल्ह्यातील बॅंकाना १५०० कर्ज प्रकरणे मंजूर करण्याचे उद्दिष्ट दिले आहे सकल मराठा समाजाच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे असून या कर्जावरील संपूर्ण व्याज सरकार भरणार आहे अस प्रतिपादन महामंडळाचे अध्यक्ष श्री नरेंद्र पाटील यांनी आज उस्मानाबाद इथ पत्रकार परिषदेत केल या वेळी श्री नरेंद्र पाटील यांनी जिल्ह्यातील अग्रणी बॅंकेसह सर्व बॅंकर्स ची जिल्हाधिकारी श्रीमती दिपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत बैठक घेउन मार्च अखेर उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आदेश दिले यावेळी मराठा क्रांती मोर्चा सह सर्व मराठा संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते