एच जी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे नागरिकांनी अडविल्या गाड्या कंपनीच्या मनमानी विरोधात अखेर नागरिक आक्रमक कंपनीच्या अधिकारी याचा उद्धटपणा

0
1032
Google search engine
Google search engine

एच जी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे नागरिकांनी अडविल्या गाड्या
कंपनीच्या मनमानी विरोधात अखेर नागरिक आक्रमक
कंपनीच्या अधिकारी याचा उद्धटपणा

चांदुर बाजार:-

चांदुर बाजार ते अमरावती 353 क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्ग चे बांधकाम जोरात सुरू असून या रोडच्या प्रति एच जी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आपला मनमानी सुरूच ठेवत होती अखेर आज सायंकाळी काबरा शाळेजवळ चांदुर बाजार तालुक्यातील नागरिकांनी कंपनीचे ट्रक अडविलीये आहे.
जवळपास 20 गाड्या नागरिकांनी अडविल्याने वाहतुकीला अडधला निर्माण झाला होता.मात्र नागरिकांचा रोष पाहता कंपनीच्या वाहकांनी गाड्या बाजूला लावून घेतल्या.तरी पण जो पर्यत कंपनीचे वरिष्ठ अधिकारी यांच्या दखल घेणार नाही तो पर्यत आंदोलन सुरूच राहणार असल्याने नगर सेवक नितीन कोरडे यांनी दै.देशोन्नती ला सांगितले.
आठ दिवसा पूर्वी कंपनीच्या एक ट्रक ने शिरखेड पोलीस स्टेशन हद्दीत एक युवकाला धडक दिली होती.त्यामुळे युवक हा मुतृ झाला होता.तरी मात्र या वर अंकुश लागत नसल्याने कंपनी वर कार्यवाही होण्यासाठी नागरिकांनी हे ट्रक अडविले.तर वारंवार निवेदन देऊन सुद्धा निवेदन ला कचरा समजण्याचे काम या कंपनीने केले आहे.वाटेल तेव्हा वाहतूक ,आणि शाळा सुटल्यावर वेगवान गतीने गाडी चालविणे. आणि रोड वर गिट्टी खाली पडणे यामुळे अति जास्त प्रमाणात धूळ होत होता मात्र या वर कंपनी तसेच स्थानिक प्रशासन याच्या वर कार्यवाही करण्यास हतबल ठरत आहे.म्हणून या कंपनी चा मनमानी पण वाढला आहे.मात्र यावर अंकुश लावणार तरी कोण हा प्रश्न आहे.
सायंकाळी 8 पर्यत तरी यावर तोडगा निघाला नसल्याने कंपनीचे सर्व ट्रक आंदोलक यांनी अडविले होते
यावेळी , जितू भट,मुरली माकोडे,शिशिर माकोडे,समीर देशमुख, लाला तिवारी,वैभव तिखिले,चिंटू वैश्य,तसेच चांदुर बाजार तालुक्यातील शेकडो नागरिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया:-
1)शालेय परिसरातून सायंकाळी 5 च्या दरम्यान कंपनीच्या वाहतूक बंद करण्यासाठी वारंवार निवेदन देण्यात आले.मात्र कंपनीने कोणतीच दखल घेतली नाही. त्यामुळे हे आंदोलन करण्यात आले त्या शिवाय कंपनी ला जाग येणार नाही.
नितीन कोरडे नगरसेवक चांदुर बाजार

2)मी काही सुपर मॅन नाही उडून तिथं यायला.आम्ही काम करत आहे.मी आजच सर्वांना सांगतो जर त्यांनी ऐकले नाही तर ते पुन्हा गाड्या अडवू शकता.
तांबेकर एच जी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी