ग्रामीण डाक सेवक पदासाठी 7 ते 12 ऑगस्ट दरम्यान ऑनलाईन अर्ज नोंदणी

0
642
Google search engine
Google search engine

• पूर्वी नोंदणी करूनसुद्धा पुढे अर्ज सादर करू न शकलेल्या उमेदवारांनीच अर्ज करावे
• www.appost.in/gdsonline या संकेतस्थळावर नोंदणी

बुलडाणा-

 

भारतीय टपाल खात्यामार्फत महाराष्ट्र व गोवा राज्यातील रिक्त असलेल्या ग्रामीण डाक सेवक पदांच्या जागा ऑनलाईन भरतीपद्धतीद्वारे भरण्यात येणार आहे. ही प्रक्रिया एप्रिल 2017 मध्ये राबविण्यात आली होती. मात्र या कालावधीत अनेक उमेदवारांना ऑनलाईन भरतीच्या संकेतस्थळाला नोंदणी करूनसुद्धा काही कारणास्तव अर्ज पुढे सादर करता आलेले नाहीत. अशा ऑनलाईन नोंदणी केलेल्या परंतु पुढे अर्ज सादर करू न शकलेल्या उमेदवारांसाठी अर्ज सादर करण्याची एक संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार या उमेदवारांनी 7 ते 12 ऑगस्ट 2017 दरम्यान www.appost.in/gdsonline या संकेतस्थळावर आपला अर्ज भरावा.
सदरची संधी ही नविन नोंदणीकरीता नसून केवळ ऑनलाईन भरतीकरीता पुर्वी नोंदणी करूनसुद्धा पुढे अर्ज सादर करू न शकलेल्या उमेदवारांसाठीच उपलब्ध आहे. सदरच्या संधीस कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ दिली जाणार नाही. तरी ऑनलाईन नोंदणी करूनसुद्धा पुढे अर्ज सादर करू न शकलेल्या उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे डाक विभागाच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.