मोर्शी येथे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी देवेंद्र भुयार यांच्या नेतृत्वात शेकडो संत्रा उत्पादक शेतकरी एकत्र  ! संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात  !

0
1231
Google search engine
Google search engine

उप विभागीय अधिकारी कार्यालयासमोर संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे लोटांगण आंदोलन !

७ दिवसात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोबदला न मिळाल्यास दापोरी येथे १८ तारखेला चक्काजाम आंदोलनाचा ईशारा !

रुपेश वाळके /मोर्शी –

मोर्शी तालुक्यात फेब्रुवारी २०१६ मध्ये झालेल्या गारपिटीमुळे संत्र्याची झालेली नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र भुयार यांनी मोर्शी येथील उप विभागीय महसूल अधिकारी यांच्या कार्यालयासमोर दि १० आक्टोबर रोजी शेकडो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या उपस्थितीत उप विभागीय अधिकारी मनोहरराव कडू यांच्या कार्यालयासमोर लोटांगण घालून आंदोलन केले .

मोर्शी तालुक्यामध्ये फेब्रुवारी २०१६ मध्ये झालेल्या गरपीटीमध्ये संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे संत्रा झाडांचे व संत्रा फळांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते तेव्हा कृषी विभागाने संत्रा बागांची पाहणी करून पंचनामे करून मोर्शी तालुक्यातील १८०६ शेतकऱ्यांचे एकून बाधित क्षेत्र १५८७.५ हेक्टर करीता आवश्यक निधी २ कोटी ६३ लाख ५२६५० रुपयांची मागणी शासनाकडे केली असता शासनाकडून फक्त १ कोटी ५४ लाख ५० हजार रुपये एवढाच निधी प्राप्त झाला अजूनही शासनाकडून १ कोटी ९ लाख २६५० एवढा निधी अप्राप्त असल्यामुळे शासनाच्या व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षितपणामुळे मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी मदतीपासून वंचित आहे . मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून संत्रा बागा वाचविल्या आणि शासनाकडे संत्रा नुकसानीची मागणी केली मात्र अजूनही मोर्शी तालुक्यातील शेकडो संत्रा उत्पादक शेतकरी या मदतीपासून वंचित असून शासनाकडून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे १ कोटी ९ लक्ष २६५० रुपये अनुदान मागणी शासनाकडे करून सुद्धा मदत मिळत नसल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी तीन वर्षांपासून मदतीपासून वंचित आहे संत्रा बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यावर त्याचं सर्वेक्षण करुनही मदत देण्यात आली नाही. कपाशीला आणि संत्र्यांना आता भाव मिळत नाही. त्यातही यंदा मृग बहार फुटलाच नाही , उत्पादन खर्चच नाही तर मागील वर्षी तोडणीचा खर्च निघाला नसल्याने संत्री झाडालाच लाटकली राहिली .आणि खराब होऊन गळली . असे असताना राज्य शासन मात्र कुंभकर्णी झोपेत आहे. शासनाची ही झोप उडण्यासाठी व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी दिवाळीच्या आधल्या दिवशी १८ आकटोबर रोजी दापोरी येथे हजारो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या उपस्थितीत चक्काजाम आदोलन करणार असल्याचा ईशारा देवेंद्र भुयार यांनी दिला आहे . संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यां संदर्भात २६ सप्टेंबरला तहसीलदार यांच्या कक्षात भाकर ठेचा आंदोलन केले होते १४ दिवसाच्या आत संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा ईशारा दिला होता परंतु १५ दिवस लोटून सुद्धा प्रशासनाने याची दखल घेतली नसल्यामुळे अखेर उप विभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर लोटांगण आंदोलन करून शासनाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे अनुदान ७दिवसात त्यांच्या खात्यात जमा न केल्यास मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरून दापोरी येथे भव्य चक्काजाम आंदोलन करणार असल्याचा ईशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र भुयार यांनी यावेळी दिला.

मोर्शी तालुका संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असून मोर्शी तालुक्यात विक्रमी संत्रा उत्पादन घोडदेव ,डोंगर यावली , दापोरी , पाळा , हिवरखेड , बेलोना , सालबर्डी , मायवाडी , भाईपुर , तरोडा , धानोरा , भिवकुंडी , आदी परिसरात करोडो रुपयांची उलाढाल संत्रा उत्पादनातून होत असून संत्रा उत्पादक शेतकरी शेतमालाच्या उत्पादनात दिवसेंदिवस घट होत आहे. कधी नैसर्गिक आपत्ती, गारपीट , संत्रा झाडांवर विविध रोगांचे आक्रमण तर कधी वन्यप्राण्यांनी केलेले पिकांचे नुकसान तसेच सरकारच्या चुकीच्या धोरणाला शेतकरी बळी पडला आहे. पण, त्याच्या वेदनेकडे कोणीही लक्ष देत नाहीत. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात होणार असल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हे लोटांगण आंदोलन करण्यात आले होते . लोटांगण आंदोलन जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र भुयार यांच्या नेतृत्वात मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी सुभाष होले , प्रकाश फलके , सोमेश्वर काळे , हेमराज फलके , अण्णा राऊत , सुनील केचे , रवी मानकर , केशव पांडे , प्रकाश अंधारे , विनोद ठोके , रामेश्वर राऊत , रवींद्र पाटील , निखिल फलके , हर्षल फलके , राजेंद्र विघे , स्वप्नील राऊत , अरुण बांबल , हेमराज कडू , बाबुराव अंधारे , राजेंद्र काळे , उत्तम होले , ज्ञानेश्वर डवरे , ज्ञानेश्वर धाडसे , निलेश गलफट , मनोज मस्के , ओंकार काळे , गिरीश काळे , प्रशांत पन्नासे , धनराज बिसंदरें , यांच्यासह या आंदोलनात शेकडो संत्रा उत्पादक शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.