मारोती कारची एसटी बसला जोरदार धडक- दुचाकीला ओव्हरटेक करतांना घडला अपघात -दोघे गंभीर जख्मी

0
1373
Google search engine
Google search engine

यशवंत जिनाजवळ घडला अपघात

चांदूर रेल्वे / शहेजाद खान –

दुचाकीला ओव्हरटेक करतांना मारोती ८००कार (एमएच ०२ अ‍ेयु ८१०५) ने एसटी बस
(एमएच ४०एन ८९२५) ला जोरदार धडक दिल्याची घटना गुरूवारी (ता.२६) दुपारी २ वाजता
दरम्यान चांदूर रेल्वे ते देवगाव रस्त्यावर यशवंत जिनाजवळ घडली. या मध्ये दोघे गंभीर
जख्मी झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार तिवसा तालुक्यातील मार्डी येथील जाधव कुटूंब मारोती ८०० कारने
बोरगाव मेघे (जि.वर्धा) येथे निघाले होते. तर चंद्रपूर-दर्यापूर एसटी बस चांदूर रेल्वेकडे येत
होती. चांदूर रेल्वे ते देवगाव रस्त्यावर यशवंत जिनाजवळ दुचाकीला ओव्हरटेक करतांना
मारोती कारची एसटी बसला जोरदार धडक दिली. यामध्ये मारोती कार मधील सुनिता सुनिल
जाधव (वय ४०), सुनिल माधवराव जाधव (वय ४८), कुणाल सुनिल जाधव (वय ९) रा.मार्डी
व रामहरि निवृत्ती पोफळे (वय ६५) रा.विरगव्हाण आणि शिवराम राजाराम म्हात्रे (वय ४७)
रा.अकोला हे जख्मी झाले. सर्व जख्मींना आझाद हिंद मंडळ, चांदूर रेल्वेच्या कार्यकत्र्यांनी
त्वरीत स्थानिक ग्रामीण रूग्णालयात भरती केले. सुनिता सुनिल जाधव व रामहरि पोफळे
यांची प्रकृती चिंताजनक असुन त्यांच्यासह इतरांना पुढील उपचारासाठी अमरावतीला
पाठविण्यात आले. या प्रकरणी चांदूर रेल्वे पोलीसांनी बस चालक विनोद भीमराव भांडे
रा.खोलापुर ता.दर्यापूर यांच्यावर भादंवि कलम २७९ च ३३८ अन्वये गुन्हा दाखल केला.