सोलापूर – पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस चार महिन्यासाठी रद्द, मध्य रेल्वेचा निर्णय – लोकांमध्ये नाराजी

0
1184
Google search engine
Google search engine

सोलापूर (प्रतिनिधी) : –

करमाळा तालुका व सोलापुर जिल्ह्यातील प्रवाशांना सोयीची व वेळेत पोचवणारी गाडी म्हणून ओळख झालेली, आणि प्रवाशांच्या आवडीची इंद्रायणी एक्सप्रेस चार महिन्यांसाठी बंद करण्यात येणार आहे.
सोलापूर-दौंड रेल्वेमार्गावर वाशिंबे ते जेऊर दरम्यान रेल्वेमार्ग दुहेरीकरणाच्या कामासाठी येत्या १ नोव्हेंबरपासून १२५ दिवसांसाठी दररोज पावणे दोन तास रेल्वे वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे-सोलापूर-पुणे इंटरसिटी व शिर्डी-पंढरपूर-शिर्डी या दोन प्रवासी गाड्या संपूर्ण कालावधीसाठी रद्द करण्यात आल्या आहेत. तर अन्य काही गाड्या ठराविक मार्गावर धावणार आहेत.