पंढरपूर येथे कार्तिकी वारीची सिद्धता अंतिम टप्प्यात – वारीसाठी मध्य रेल्वे ४ जास्त गाड्या सोडणार

0
751
Google search engine
Google search engine

पंढरपूर – कार्तिकी यात्रा काहीच दिवसांवर येऊन ठेपली असल्याने यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर मंदिर प्रशासन सज्ज झाले आहे. यंदा भाविकांना मूलभूत सुविधा पुरवण्यात येणार आहेत.

१. भाविकांना पिण्याचे शुद्ध पाणी योग्य दरात उपलब्ध होण्यासाठी पाच ठिकाणी पाण्याचे ए.टी.एम्. चालू करण्यात येणार आहेत.

२. श्री संत ज्ञानेश्‍वर दर्शन मंडपात बीएस्एन्एल्कडून भाविकांसाठी हॉट स्पॉट यंत्रणा उपलब्ध करण्यात येणार आहे. दर्शन मंडपालगत दोन ठिकाणी हिरकणी कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे.

३. दर्शन रांगेत गोंधळ होऊ नये, यासाठी बॅरिकॅटिंग आणि पूल उभारले जात आहेत.

४. काही दिवसांपासून श्री विठ्ठल मंदिर २४ घंटे दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले आहे.

५. यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त, तर श्‍वानपथक आणि बॉम्बशोधक पथक तैनात करण्यात येणार आहे. एकूण ६२ सीसीटीव्ही कॅमेरांद्वारे यात्रेवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.

६. वारीसाठी मध्य रेल्वेने ४ जास्त गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ७. यंदा सोलापूर विभागातून १३४ बसगाड्यांची सोय करण्यात आली आहे. बसगाड्या २७ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत भाविकांसाठी उपलब्ध रहातील.