भंगार बसेस वाहतूक करण्यास वापरू नका-नवीन बस ची संख्या वाढवा- प्रहार चे निवेदन

0
717
Google search engine
Google search engine

बादल डकरे / चांदुर बाजार-

चांदुर बाजार आगार मध्ये मोठ्या प्रमाणात भंगार बसेस अजून कोणत्या बस ला खिडकी नाही तरी कोणत्या बस ला काच नाही तसेच काही बसेच तर मेन दारच योग्य प्रकारे लागत नाही या सगळ्या मध्ये प्रवाशी तसेच बस चा प्रवास करणाऱ्या प्रवाशी याची जीवन धोक्यात होते या सर्वांची दखल घेत प्रहार संघटनेने आज चांदुर बाजार येथील तहसीलदार, आगार प्रमुख, ठाणेदार चांदुर बाजार याना निवेदन देऊन त्यांना नवीन बसेस ची मागणी केली आणि जुन्या आणि बंद अवस्थेत असणाऱ्या गाड्या या प्रवाशी किंवा कोणत्याच प्रकारच्या वाहतूक करिता वापरू नये असे सुद्धा या निवेदन वेळी प्रहार कार्यकर्ते यांनी सांगितले होते .
दिनांक 28 ऑक्टोबर ला बोराळा रोडवर अमरावती करिता नादुरुस्त असताना पाठवली आहे.याची माहिती बसचालक यांनी ही बाब आगार व्यवस्थापन करणाऱ्या अधिकारी यांच्या लक्ष्यात आणून दिली तरी तीच बस चालकाला नेण्यास सांगितले अखेर ती बस पुसदा जवळ बंद पडली.त्यामुळे प्रवाशी याचे चांगले त्रास सहन करावा लागला.अश्या होणाऱ्या प्रवाशी याच्या त्रास बद्दल प्रहार संघटने आज निवेदन दिले.निवेदन देताना प्रहार पक्षाचे कार्यकर्ते तसेच पदाधिकारी उपस्थित होते त्यामध्ये
श्री शिशिर माकोडे, श्री मंगेश इंगोले, श्री गणेश पुरोहित, श्री पवन वाठ, श्री सौरभ इंगोले, विशाल बंड, रुशी खोडपे, हेमंत कोंडे, समिर मेश्राम,गौरव देशमुख,शुभम कदम,धिरज, रोहन चर्जन,अक्षय देशमुख, गोलु ठाकुर, मुन्ना वैश्य,सागर सातव, चिंटू वैश्य,इत्यादी मान्यवर उपस्तीत होते