क्या हुआ तेरा वादा…? मुख्यमंत्री भाषणाला उभे राहताच सुरु झाल गान

0
764
Google search engine
Google search engine

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात धनगर समाजाच्या मेळाव्याला हजेरी लावली. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचं भाषण जेव्हा सुरु झालं, तेव्हा मंचावरच मुख्यमंत्र्यांची पंचाईत झाली.

कारण, धनगर आरक्षणाच्या वायद्याची आठवण करुन देण्यासाठी धनगर समाजातल्या काही कार्यकर्त्यांनी चक्कं काही गाणी वाजवली. या गाण्यांच्या दरम्यान एक-एक ओळीचा तपशील सुद्धा होता. ज्यातून मुख्यमंत्र्यांनी सत्तेत आल्यानंतर वेगवेगळ्या काळात काय-काय शब्द दिला, याची त्यांना आठवण करुन देण्यात आली.

ही गाणी वाजवून झाल्यानंतर आपण आरक्षणाचा शब्द विसरलो नसल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलं. धनगर आरक्षणाचं आश्वासन आपण विसरलो नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आघाडी सरकारच्या चुकीमुळे धनगर आरक्षण रखडलं. मात्र आम्ही नव्याने अहवाल तयार करुन केंद्राकडे पाठवणार आहोत. डिसेंबर 2017 मध्ये हा अहवाल येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.