आयसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित असणाऱ्या एका संशयिताला अटक

0
750
Google search engine
Google search engine

मुंबई : आयसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित असणाऱ्या एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. मुंबई विमानतळावरुन शनिवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. उत्तर प्रदेश एटीएसनं ही कारवाई केली आहे.

एटीएसच्या या कारवाईमुळे मुंबईत मोठ्या घातपाताच्या तयारीला ब्रेक मिळाल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे. अबु जाहिद सलाउद्दीन शेख असं या संशय़ित आरोपीचं नाव आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशातल्या आझमगड इथला राहणार आहे.