प्रहार संघटनेचे अध्यक्ष आ. बच्चु कडूु यांना जिवे मारण्याची धमकी

0
1657
Google search engine
Google search engine

अचलपूर :-

 

प्रहार संघटनेचे अध्यक्ष आ. बच्चु कडूु यांना शनिवार दि.४ नोव्हेंबरला रोजी सायंकाळी ८ ते ९ वाजाताच्या दरम्यान अचलपूरच्या संपर्क कार्यालयात असताना अज्ञात इसमाने  ७४७0४0३६१५ या मोबाईल नंबरवरून कॉल करून जिवे मारण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.
सदर मोबाईल क्रमांकावरुन आलेल्या धमकीमध्ये ईल भाषेचा वापर करत शासनाच्या विरोधी आंदोलन करणे बंद करा, अन्यथा जिवे मारण्यात येईल असा धमकी वजा इशारा फोनवरील व्यक्ती दिला .या प्रकरणी गंभीरता लक्षात घेता श्री बच्चु कडु यांचे खासगी स्विय सहाय्यक भास्कर मासोदकर व अंकुश जवंजाळ यांनी अचलपूर पेालीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. राज्यातील गोरगरीबांच्या न्याय व हक्कासाठी लढणार्‍या बच्चु कडु यांनी आजवर आपल्या आंदोलनामुळे अनेकांना त्यांचे हक्क मिळवून दिले आहे. करीता शासनाच्या विरोधात आंदोलन न करणे व तसेच केल्यास जिवे मारण्याची धमकी देणार्‍या अज्ञात व्यक्तीचा तपास लावून त्याच्या विरोधात तातडीने कारवाई करुन जेरबंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.घटनेचे गांभीर्य लक्षात घेता आणि प्रकरण आमदारांशी निगडीत असल्याचे तपासाची चक्रे अचलपूर पोलीस स्टेशनच्या ठोणदारांनी जलद गतीने फिरवायला सुरुवात केली आहे. या प्रकरणी अचलपूर पेालीसांनी अज्ञात आरोपी विरुध्द ५0४ व ५0७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.