पेठ मांगरुळी येथे पाणीपुरवठा टाकीचे_भूमिपूजन संपन्न -१२ लक्ष रुपये निधी उपलब्ध !

0
780
Google search engine
Google search engine

रुपेश वाळके / मोर्शी –

वरुड तालुक्यात येणा-या जिल्हा परिषद सर्कल लोणी मधील पेठ-मांगरुळी येथे दिनांक १२/११/२०१७ रोजी भव्य पाणीपुरवठा टाकीचा भूमिपूजन सोहळा माजी कृषिमंत्री तथा शिवाजी शिक्षण संस्था अध्यक्ष मा.श्री. हर्षवर्धनजी देशमुख यांचे हस्ते पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती विक्रमजी ठाकरे होते.

ग्रामिण पाणी पुरवठा विभाग जि.प.अमरावती मधून या पाणीपुरवठा टाकीच्या कामाकरिता १२ लक्ष रुपये रक्कम उपलब्ध करून दिल्याबद्दल गावक-यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सौ.सुशिलाताई कुकडे (समाजकल्याण सभापती जि.प.अम.), सौ.सिमाताई सोरगे (जि.प.सदस्या), तुषारभाऊ निकम (पं.स.सदस्य), राजूभाऊ पापडकर (पं.स.सदस्य), राजाभाऊ कुकडे (माजी सभापती पं.स.वरुड), प्रतापभाऊ वानखडे (सरपंच, ग्रा.पं.पेठ), सौ.चंदाताई ब्राम्हणे (उपसरपंच, ग्रा.पं.पेठ), ग्रा.पं.सदस्य अनिलभाऊ ढोरे, शैलेशभाऊ घोरपडे, सौ.कुसुमताई ढोकणे, सौ.मालाताई भुसारी, सौ.जयश्रीताई वानखडे, ग्रा.पं.सचिव सागरजी भातुलकर, प्रमोदभाऊ वानखडे, नरेंद्रजी खुरद, सुखदेवरावजी शिरभाते, बाबारावजी वानखडे, पांडुरंगजी घोरमाडे, मिलिंदजी बोडखे, वसंतराव वानखडे, बाबारावजी फुलसावंदे, सुरेशराव बुटे, सुरेशराव घोरपडे, मिलिंदभाऊ पोतदार, अशोकराव ढोकणे, राहुलभाऊ बोडखे, नामदेवराव महल्ले, भगवंतरावजी बोडखे, बाबारावजी घ्यार, बाबारावजी ब्राम्हणे, सुभाषराव भुसारी, वैभवभाऊ पोतदार, सारंगभाऊ काळमेघ, सागरभाऊ वानखडे, प्रशांतजी वानखडे, प्रफुलभाऊ भड, रविन्द्रजी धोंडे, छायाताई घ्यार तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.