मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण देणार – आयुक्त डॉ. श्री रामास्वामी एन.

0
922
Google search engine
Google search engine

हेंकेल इंडियाच्या सीएसआर डिजीटल एज्युकेशन उपक्रमाचे उद्घाटन

नवी मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ) – हेंकेल इंडिया सीएसआरच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार डिजिटल शिक्षण देणार असल्याचे प्रतिपादन नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी केले.

 

 

हेंकेल अढेसीव्हज टेक्नोलॉजीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (हेंकेल इंडिया) ही हेंकेल एजी अँड कंपनी केजीएए, जर्मनीची पूर्ण मालकी असलेली सहयोगी कंपनी असून त्यांनी सीएसआर डिजीटल एज्युकेशन उपक्रमाची सुरुवात केली. महाराष्ट्रातील शाळांकरिता हा उपक्रम सुरू करण्यात आला असून एनएमएमसी शाळा क्र. 38 व 74, सेक्टर 2, कोपरखैरणे, नवी मुंबई येथे शहराचे पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ. रामास्वामी एन. म्हणाले की, “भारतीय शैक्षणिक यंत्रणेने बरीच तांत्रिक प्रगती साधली आहे; परंतु, सगळ्या शाळांमध्ये या सुविधा नाहीत.

 

हेंकेल इंडियाचा हा उपक्रम सरकारी शाळांमधील शिक्षकांना विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यात बराच सहाय्यकारी ठरेल.” तसेच उद्घाटन प्रसंगी बोलताना हेंकेलचे भारतातील कंट्री प्रेसिडेंट शिलीप कुमार म्हणाले की, “एक कंपनी म्हणून सामाजिक प्रगती हा कायमच हेंकेलचे महत्त्वपूर्ण अंग राहिले आहे.

 

 

दर्जेदार शिक्षण आणि सुयोग्य शैक्षणिक वातावरण मानवी विकासात मोलाचा हातभार लावतात. आमच्या याप्रकारच्या सामाजिक साह्याने सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात नक्कीच फरक पडेल.” महाराष्ट्रातील सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना संगणक सुविधा आणि राज्य मंडळाचा अभ्यासक्रम मल्टीमीडिया प्रकारात (डिजीटल क्लास) उपलब्ध करून त्यांना उत्कृष्ट शैक्षणिक अनुभव मिळवून देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. हेंकेल इंडियाच्या 2017-18 वित्त वर्षाचा भाग असलेल्या सीएसआर उपक्रमातंर्गत नवी मुंबई, ठाणे, कुरकुंभ आणि जेजुरी येथील 20 शाळांमध्ये 40हून अधिक डिजीटल क्लासेस उपलब्ध करून दिले आहेत. प्रत्येक डिजीटल क्लासमध्ये 55 इंचाचा एलईडी टीव्ही, विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमसोबत पीसी स्टीक, राज्य मंडळाचा अभ्यासक्रम, वायरलेस कीबोर्ड आणि माउसची सुविधा असेल. नवी मुंबईतील 2 कम्प्युटर सेंटर्सशिवाय हेंकेल इंडियाने या शाळांमध्ये 40 संगणक बसवले आहेत. मागच्या वर्षीच्या बेसलाईन अभ्यासक्रमावर आधारित या डिजीटल उपक्रमाशिवाय यंदाच्या आर्थिक वर्षात हेंकेल इंडिया सुमारे 11 शाळांमध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहाची बांधणी करून पायाभूत सुविधा अद्ययावत करणार आहे.  हे उपक्रम आमचा एनजीओ भागीदार इडरेस्ट (एंटरप्रीन्यूअरशीप डेव्हलमेंट अँड रिसोर्सेस सपोर्ट ट्रस्ट)च्या सहाय्याने आयोजित करण्यात येत आहेत, ज्याचा लाभ अंदाजे 5 हजार विद्यार्थ्यांना होतो आहे.