ब्राम्हणवाडा थडी पोलिसांचा कार्यवाही चे सत्र सुरूच अनेक अवैध धंद्यावर लगाम -ठाणेदार सचिन तायवाडे स्वतः करीत आहे कार्यवाही

0
918
Google search engine
Google search engine

बादल डकरे / चांदुर बाजार –

मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र याच्या सीमेला लागून असलेले चांदुर बाजार तालुक्यातील ब्राम्हणवडा थडी येथे अनेक दिवसांपासून अवैध धंदा मोठ्या प्रमाणात सुरू होते.मात्र पोलीस स्टेशन मधील काम काजवर स्वतः ठाणेदार तायवाडे यांनी लक्ष केंद्रित केले आहे.कार्यवाहीची सत्र सुरू केले.त्यामध्ये त्यानि निवडक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी याची टीम तयार केले.त्यांच्या या कार्यवाही मुळे अवैध धंदे आणि अवैध धंदे करणारे याना मोठ्या प्रमाणात फटका मिडाला आहे.

 

काल दिनांक 29 नोव्हेंबर ला पोलिसांना गुप्त माहिती मिडाळी त्यावरून पोलिसांनी ब्राम्हणवडा थडी येथे नाकाबंदी केली असता त्यांना टाटा सुमो गाडी क्रमांक MH 15 AH 7023 या गाडीची झडती घेतली असता त्यांना त्यामध्ये 13 सागवान चरपत की 11700 रुपये चा माल मिळून आला.त्यामध्ये पोलिसांनी टाटा सुमो गाडी अंदाजित किंमत 10,00,000 जप्त केली असून आरोपी नाजीम खा साहेब वय 28 रा.पठाण पुरा ब्राम्हणवाडा याला अटक केली.पुढील कार्यवाही करण्यासाठी वनविभाग याना पाचारण करण्यात आले.ही कार्यवाही ठाणेदार श्री सचिन तायवाडे यांचा टीम ने केली.

दिनांक 30 ला चिंचोली या ठिकाणी नाकाबंदी केली असता आरोपी तुकाराम सीताराम लोखंडे याला ताब्यात घेतले असता त्याच्या कडून 60 लिटर गावठी दारू अंदाजित रक्कम 7000 आणि सायकल असा मुद्दे माल जप्त करण्यात आला.ही कार्यवाही ठाणेदार सचिन तायवाडे यांनी आणि त्यांच्या टीम ने केली.