शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची अंमलबजावणी करून सात-बारा कोरा करा – प्रहार चा जिल्हाधिकारी कार्यलयावर मोर्चा व निवेदन

0
1051
Google search engine
Google search engine

अमरावती / सुरज देवहाते –

प्रहारचा सरकारला इशारा कोरा करा सात/बारा. संदर्भात आज जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. स्थानिक गाडगे नगर येथी श्री संत गाडगे बाबा मंदिर येथून समस्त शेतकरी प्रहार पदाधिकारी, तालुकाप्रमुख ,सर्व प्रहार नगरसेवक ,जिल्हापरिषद कार्यकर्त्ये मोठ्या संख्ये यात सहभागी झाले होते.तद्नंतर गाड्यांचा ताफ्यासोबत समस्त कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यलयात दाखल झाले तेथे जिल्हाधिकाऱ्याना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांचा संपूर्ण कर्जमाफीची घोषणा तर केली मात्र अंमलबजावणी केली नाही त्यातच प्रतीचा पाउस , गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन , तूर व संत्रा पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले असून बोंडअळीचा प्रभावाने संपूर्ण कापसाचे पिक नष्ट झाले आहे त्यात शेक्र्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची अंमलबजावणी करून सात-बारा कोरा करावा अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे आमदार शीर बच्चू कडू यांनी केली आहे . सादर निवेदन संपूर्ण राज्यात प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदिप वडतकर जिल्हा संपर्कप्रमुख, बल्लुभाऊ जवंजाळ प्रहार महाराष्ट्र कोषाअध्यक्ष,मंगेश देशमुख शेतकरी संघटना जिल्हाप्रमुख,प्रविण हेंडवे जिल्हाप्रमुख,अनिल खांडेकर महाराष्ट्र सचिव,चंदु खेडकर शहरप्रमुख,मंगेश इंगोले,भारत जवंजाळ,तेजस धुर्वे, उप जिल्हाप्रमुख,महेश कुरळकर,गजानन भुगल, प्रदिप निमकाडे,अनिल पटेल,प्रदिप बंड,नंदु विधळे, विनोद बोबडे,सचिन पिसे,चंक्की देशमुख,मनोज जैस्वाल,श्याम मसराम,मुन्ना बोंडे, संतोष किटुकले,आकाश कांबळे,सुरेश गणेशकर,संजय झिगरे,राजेश सोलव,राजेश वाटाणे,अरुण ठाकुर,नितीन कोरडे, निलेश वाटाणे,विशाल बंड,अजय तायडे,राहुल खापरे, मंगेश अर्डक,भैय्या ठाकरे, बबलु पावडे,सचिन पावडे, राजेश वाटाने,शिवा राऊत,प्रदिप जैस्वाल,नईम खान,मुन्ना खेरडे नगर सेवक,पिन्टु बोबडे,गजानन काळे, राजु कोकरे, किशोर वानखडे, गजा धनसांन्डे,जावेद खान,जुबेर खान,अतुल शेळके,प्रविण रोहणकर,अमर ठाकरे, प्रफुल डाफ,राहुल चांभारे,विशाल सावलकर, ऩिखील कुटे,योगेश हेंबाडे,विष्णू साखरे,भास्कर मासुतकर,सौरभ ठाकरे,प्रशांत आवारे,दिपक धुळधर, मंगेश हुड,अरूनभाऊ पिसे, संतोष किटुकले,निलेश वाटाने,सुरेश गनेशकर,सौरभ ईंगोले,मोहन भाऊ, मुजिफ खान, भैय्या कडू,संदिप चरपे,अनुराग बर्डे,कपिल ठाकरे, महिंद्रा चांदा,ऋषभ गावंडे,करण धंदर,शेकडो कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते.
आंदोलनाची धास्ती घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

प्रहार तर्फे निवेदन द्वारे केलेल्या मागण्या –

  • शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून ७/१२ कोरा करण्यात यावा
  • बोंड अळी मुळे नुकसान ग्रस्त शेतकरीयांना विनाअट एकरी २५००० हजाराची मदत द्यावी
  • नुकसानग्रस्त संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना १ लाख अनुदान देण्यात यावे.
  • शेतकऱ्यांचा कृषी पंपाचे वीजबिल माफ करून 24 तास विद्युत पुरवठा देण्यात यावा.
  • सोयाबीन तूर उत्पादकांना / शेतकऱ्यांना हेक्टरी २५००० अनुदान देण्यात यावे.
  • स्वामिनाथन आयोग लागू करावा.
  • पेरणी ते कापणी पर्यंत सर्व कामे MREGS मध्ये घ्यावी

देण्यात आलेले निवेदन प्रत

सदर निवेदनाचा प्रतीलिपी मा. जिल्हाधिकारी , मा पोलीस आयुक्त , मा मुख्य वनरक्षक सर्व अमरावती यांनाही देण्यात आल्या.