आष्टी आरोग्य केंद्राची अँम्ब्युलन्स झाली खटारी – गरोदर मातेची वाहतुक करतांना पडली होती बंद.

0
672
Google search engine
Google search engine

टाकरखेडा संभु /संतोश शेंडे –

येथुनच जवळ असलेल्या आष्टी आरोग्य केंद्रामध्ये गेल्या १५ वर्षापासुन एकच अँम्बुलन्स आहे.मर्यादा संपुनही ही अँम्बुलन्स आरोग्य सेवेमध्ये वापरल्या जाते.एकदा गरोदर मातेची वाहतुक करतांना या अँम्बुलन्स ने मध्येच दगा दिला होता त्यामुळे एैनवेळी खाजगी वाहनाला घटनास्थळी बोलविण्यात आले आणी त्या गरोदर मातेला सुखरुप रुग्णालयात पोहचविले.तरी देखील आरोग्य विभागाला जाग आली नाही.
आरोग्य विभाग म्हटला की,अतीसंवेदनशिल विभाग समजला जातो.या विभागामध्ये अत्याधुनिक सुविधांसह अँम्बुलन्स देखिल नवीन असणे गरजेचे आहे त्यात ग्रामीण भागात नविन अँम्बुलन्सची अधिक गरज भासते अश्यातच आष्टी येथील आरोग्य केंद्रामध्ये गेल्या १५ वर्षापासुन एकच अँम्बुलन्स सेवेत आहे.साधारण: १० वर्षाच्या वर अँम्बुलन्स वापरता येत नाही अश्या अँम्बुलन्स निर्लगीत करणे आवश्यक आहे परंतु आरोग्य विभागाच्या बेजबाबदार पणामुळे १५ वर्षापासुन एकच अँम्बुलन्स या आरोग्य केंद्राच्या सेवेत आहे.या आरोग्य केंद्रांतर्गत २८ गावे येतात साधारणत: ग्रामिण भाग असल्याने येथे अँम्बुलन्सची अधिक गरज भासते असे असतांना १५ वर्षापुर्वी खटारा झालेली अँम्बुलन्स रुग्णांच्या सेवेत वापरल्या जात आहे.त्याचा एकदा फटका देखील रुग्णांना बसला आहे.
आष्टी येथीलच एका गरोदर मातेला डफरीनमध्ये दाखल करायचे होते परंतू ती अँम्बुलन्स मध्येच बंद पडल्याने ऐनवेळी खाजगी वाहनामध्ये सदर महीलेला अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल केले होते.त्यानंतरही आरोग्य यंत्रणेला जाग आली नाही.एखाद्यांचा बळी घेतल्यानंतरच ही अँम्बुलन्स बदलणार का अश्या प्रतिक्रिया उमटत आहे

*वरिष्ठांना वाहन बदलविण्या संदर्भात पत्र दिले आहे*

ही गाडी जुनी असल्याने वारंवार गाडीची दुरुस्ती करावी लागते याबाबत आरोग्य यंत्रणेच्या तांत्रिक विभागाकडे याबाबत पत्रव्यवहार केला आहे. सी.सिरीजच्या गाड्या बदलण्या संदर्भात त्यांनी यावर मार्गदर्शन केले आहे.आमचा पाठपुरावा सुरुच आहे.

डॉ.राजेंद्र दाळु.वैद्यकीय अधिकारी. आष्टी