कोल्हापूर : कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण, संशयित वीरेंद्र तावडेला जामीन मंजूर

0
1072
Google search engine
Google search engine

सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणातील संशयित आरोपी डॉ. विरेंद्र तावडेला जमीन मंजूर झाला. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने हा जामीन मंजूर केला आहे. पण, न्यायालयाने तावडेला पासपोर्ट जमा करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कोल्हापूर शहरात येण्यासही न्यायालयाने मज्जाव केला आहे. त्याचबरोबर या प्रकरणातील कोणत्याही साक्षीदारावर दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये तसेच, दर शनिवारी एसआयटीसमोर हजेरी लावावी, अशा अटींसह न्यायालयाने तावडेला जामीन मंजूर केला आहे.