*प्रगटदिन महोत्सव निमित्य शांतीवन अमृततिर्थ येथे श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ व विविध कार्यक्रम*

0
611
Google search engine
Google search engine

छत्तीसगड येथील श्री स्वामी अशोकानंद महाराज यांचे संगीतमय कथावाचन

आकोटः/संतोष विनके-

ब्रम्हांडनायक योगीराज श्री संत गजानन महाराज प्रगटदिन महोत्सव दरवर्षी प्रमाणे पोपटखेड रोड वरील शांतीवन अमृततिर्थ ,अकोली जहाँ. – अकोलखेड येथे उत्साहात साजरा होणार आहे.दि.31 जाने. ते 7 फेंब्रु. या दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .दरवर्षी प्रमाणे भाविकांना यावेळी पन अध्यात्म पर्वणी लाभणार असुन छत्तीसगड येथील प्रसिध्द कथावाचक श्री स्वामी अशोकानंद महाराज यांच्या सुमधुर वाणीतुन संगीतमय श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ होणार आहे.याकथेची वेळ दररोज दु.१ते ५ अशी असणार आहे. प्रकटदिन उत्सवा निमित्य यासह रोज दैनदिन कार्यक्रमामध्ये स.६ वा. काकडा,स.८ते १० श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण होईल.तर स.११ ते १२.३० भोजन प्रसाद दुपारी१ते ५ भागवत कथा ,त्यानंतर सायं.५.३० ला हरीपाठ व राञी ७ वा.हरीकिर्तनाचा कार्यक्रम होईल.गुरुवार दि.१ फेंब्र. ला श्रीं ना छप्पनभोग प्रसादाचा नैवेद्य अपर्ण करण्यात येईल. दैनंदिन किर्तनाच्या कार्यक्रमात दि.३१ता.ह.भ.प.श्री.रमेश महाराज अवारे, दि.१ ह.भ.प.श्री.सुभाष महाराज काळे,दि.२ ह.भ.प.श्री.गणेश महाराज शेटे ,दि.३ श्री.ह.भ.प.श्री.रामेश्वर महाराज अतकरे ,दि.४ ह.भ.प.श्री.ज्ञानेश्वर महाराज मानकर ,दि.५ ह.भ.प.श्री.लक्ष्मीनारायण महाराज दायमा,दि.६ ह.भ.प.श्री.पुरुषोत्तम महाराज बावस्कार हे हरीकिर्तन करणार आहेत.याच दिवशी भागवत कथेची समाप्ती होणार असुन बुधवार दि.७ फेंब्र.ला मुख्य कार्यक्रम श्रीं चा प्रगटदिन उत्सव संपन्न होणार.सकाळी श्रीं चे अभिषेक,पुजन होउन स.८ते१० श्रींच्या पादुकांची व मुखवट्याची पालखीतुन नगरप्रदक्षिणा .त्यानंतर स.१०ते १२ श्री .ह.भ.प.विठ्ठल महाराज साबळे यांचे काल्याचे किर्तन पार पडुन उत्सवाची सांगता होईल तर दु.१२वा.पासुन श्री भक्तांना भव्य महाप्रसादाचे वाटप होईल.तसेच भाविकांच्या सोईसाठी सामाजीक जाणीवेतुन दि.४ फेंब्र.ला स.११ते ४ स्ञी रोग निदान शिबीर व रक्तदान शिबीर पार पडणार स्ञी रोग निदान शिबीरात डॉ .हर्षवर्धन मालोकार,डॉ.संगीता लोखंडे,डॉ. भाग्यश्री वानखडे,डॉ.शाम केला,डॉ.डी.एच.राठी.डॉ.एन .जे.गांधी हे सेवा देतील.तरी श्रीभक्तांनी प्रगटदिन महोत्सव निमित्य आयोजीत या विविध कार्यक्रंमाचा लाभ घ्यावा.