गारपीट ग्रस्त शेतकऱ्यांना ताबडतोब नुकसान भरपाई द्या – वित्तमंत्र्यांनाकडे आ.डॉ.अनिल बोंडे यांची मागणी

0
939
Google search engine
Google search engine

अमरावती :  जिल्ह्यासह मोर्शी-वरुड तालुक्यात दोन दिवसाअगोदर मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह वीज पडून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते, गारपीट ग्रस्त शेतकरी बांधवांना लवकरच शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी, तसेच मच्छिमार संस्थेला रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा, यासाठी राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री सुधीर मुंगटीवार हे आज बुधवार दि.१४ फेब्रुवारी २०१८ रोजी अमरावती दौऱ्यावर आले असता, त्यांना मोर्शी – वरुड विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.अनिल बोंडे यांनी निवेदन देऊन शेतकरी बांधवांच्या वतीने नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली.

 

 

यावेळी राज्याचे उद्योग, खनिकर्म राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील, एमआयडीसीचे अध्यक्ष किरण पातुरकर, सामाजिक कार्यकर्ते बाळूभाऊ मुरुमकर यांच्यासह शेतकरी व मच्छिमार संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.