सुगंधित तंबाखु , खर्रा, पानमसाला, गुटखा, सुगंधित सुपारी विक्री करणाऱ्यावर कार्यवाही होणार

0
646
Google search engine
Google search engine

गडचिरोली- मागील काही दिवसांपुर्वी ज्या पानठेला धारकांवर कारवाई झालेली आहे. ती कारवाई फक्त खर्रा, सुगंधित तंबाखु हया शासनाने उत्पादन , साठा, वितरण व विक्री करीता प्रतिबंधित अन्न पदार्थ विकल्यामुळे केलेल्या आहेत. तसेच सिगारेट व तंबाखुजन्य पदार्थ प्रतिबंधक कायदा 2003 या कायदयांतर्गत सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणे, 18 वर्षाखालील व्यक्तींना तंबाखुजन्य पदार्थ विकणे, तसेच शाळेच्या 100 यार्डच्या परिसरात तंबाखुजन्य पदार्थांची विक्री केल्यास रुपये 200/- दंड केला जाईल. 


तसेच पानठेल्यामध्ये पान, साधी सुपारी, चॉकलेट इत्यादी खादयपदार्थाची विक्री करण्यास कोणत्याही प्रकारची बंदी नसुन ते पानठेला धारक अशा अन्न पदार्थांची विक्री करीत आहेत. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येणार नाही. तसेच जे पानठेले धारक महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अन्न पदार्थ जसे सुगंधित तंबाखु, खर्रा, पानमसाला, गुटखा, सुगंधित सुपारी यांची विक्री करतील त्यांच्यावर पाळत ठेऊन अन्न व औषध प्रशासनामार्फत कायदेशिर कारवाई करण्यात येईल असे सहायक आयुक्त, (अन्न) अन्न व औषध प्रशासन गडचिरोली यांनी कळविले आहे.