मुख्य रस्ता व बाजार ओळीतील भाजी व फळ विक्रेत्यांना आठवडी बाजारात जागा उपलब्ध करून द्या >< नगरसेविकेची मागणी

0
642
Google search engine
Google search engine
चांदुर रेल्वे – (शहेजाद खान ) 
       शहरातील मुख्य रस्ता व बाजार ओळीतील भाजी व फळ विक्रेत्यांना आठवडी बाजारात जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी एका नगरसेविकेने मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे.
       शहरातील मुख्य रस्ता बाजार ओळीमध्ये फळ व भाजी विक्रेत्यांची दुकाने रस्त्याच्या समोरपर्यंत लागलेली आहे. सदर ठिकाणी रोज कचऱ्याचा ढिग पडुन राहते. या रस्त्यावर शिवाजी कन्या शाळा आहे. या रस्त्याने मुलींना जाणे-येणे सुध्दा कठीण झाले असुन छेडखानी, चिरीमारी अशा घटना रोज घडत आहे. परंतु बदनामी होईल या भीतीने कोणी तक्रारसुध्दा करीत नसुन भाजी व फळ विक्रेत्यांना रस्त्यावर गाडी न लाऊ देता त्यांना आठवडी बाजारात जागा उपलब्ध करून देण्याची मागणी नगरसेविका सौ. सुरेखा विलास तांडेकर यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे. व सदर दुकाने रस्त्यावर आढळल्यास मोठ्या दंडाच्या कारवाईची मागणीसुध्दा केली आहे.