‘शांतीवन’ अशांत करण्याचा काही लोकांचा प्रयत्न – शांतीवनच्या नागरगोजे दाम्पत्याला मारहाण

0
1563
Google search engine
Google search engine

बीड : नितीन ढाकणे :-

शिरुर कासार : – अनेक समाज उपयोगी कार्यक्रम राबून समाजासाठी कार्य करण्याची तळमळ असणाऱ्या व्यक्तींवर झालेला हल्ला हा समाजासाठी कार्य करणाऱ्यांसाठी धोक्याची घंटाच समजली जात आहे. नवी दिशा सारखे कार्यक्रम राबवून तरुणांना प्रोत्साहन देणे, यकब बरोबर अनेक सामाजिक कार्य शांतीवन च्या माध्यमातून केले जातात. काहींना हेच रुचत नसावे. त्यामुळेच रविवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास ६ जणांनी सामाजिक कार्यकर्ते दिपक नागरगोजे यांच्या शिरूर कासार तालुक्यातील आर्वी येथील ‘शांतीवन’ सामाजिक प्रकल्पातील घरात घुसून हल्ला केल्याची घटना घडली. यामध्ये दीपक नागरगोजे आणि त्यांच्या पत्नीस मारहाण करण्यात आली. याप्रकरणी शिरूर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शांतीवन सामाजिक प्रकल्पाचे दिपक शाहुराव नागरगोजे यांनी फिर्यादीत नमूद केल्यानुसार २ दिवसापासून एका बनावट क्लिपद्वारे त्यांना आणि त्यांच्या संस्थेस बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. व्हाट्सअप वरील ग्रुपवर त्यांनी हि क्लिप प्रथम पहिली . क्लिप टाकणाऱ्या गणेश नेटके याच्याकडे नागरगोजे यांनी फोन करून चौकशी केली असता त्याने सदरील क्लिप डी. जी. मळेकर यांचा वाहनचालक ज्ञानेश्वर याने पाठवली असून सर्वत्र पसरवण्यासाठी करण्यासाठी आग्रह केल्याचे सांगितले.
दि. १८ मार्च रोजी रात्री ८.४० वाजता बलभीम मळेकर यांनी फोन करून नागरगोजे यांना येऊ का असे विचारले आणि १० वाजताच्या सुमारास ते नागरगोजे यांच्या घरी आले. घरात प्रवेश करताच त्याने अश्लील शिवीगाळ सुरु केली आणि तुला संस्था चालवयाची आहे का? मला डी.जी.मळेकर यांनी सांगितले आहे असे ओरडू लागला. तेवढ्यात आतून पत्नी कावेरी यांचा ओरडण्याचा आवाज आल्याने दिपक नागरगोजे आतमध्ये गेले असता मनोज सखाराम तळेकर हा कावेरी यांच्या अंगावरील दागिने घेत असल्याचे दिसून आले. बाहेर आणखी तीन अज्ञात व्यक्ती उभ्या होत्या. या व्यक्तींकडे तलवारी तर बलभीम मळेकर याच्याकडे कुकरी होती. तेवढ्यात नागरगोजे दाम्पत्याचा आरडाओरडा ऐकून इतर लोक तिथे जमा झाल्याने सखाराम मळेकर, मनोज मळेकर आणि तीन अज्ञात पळून गेले,
मात्र बलभीम मळेकर यास लोकांनी पकडून डांबले. जमा झालेल्या लोकांनी नागरगोजे दाम्पत्यास बीड येथील रुग्णालयात दाखल केले असे दीपक नागरगोजे यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.
याप्रकरणी नागरगोजे यांच्या फिर्यादीवरून सर्व आरोपींवर कलम ३२७, १४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६ आणि शस्त्रास्त्र कायदा कलम २५ अन्वये शिरूर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.