परळी – बीड – नगर रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारने केला ७५ कोटीचा निधी वितरित

0
1052
Google search engine
Google search engine

*पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे*

*परळी – बीड – नगर रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारने केला ७५ कोटीचा निधी वितरित*

बीड : दिपक गित्ते,नितीन ढाकणे

दि २२ —– राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे परळी – बीड – नगर रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारने ७५ कोटीचा निधी आज वितरित केला. दरम्यान, राज्य सरकारने फेब्रुवारी २०१८ अखेर या प्रकल्पासाठी एकूण ७१६ कोटी ८४ लाख रुपये इतका निधी दिला आहे.

बीडच्या जनतेचा जिव्हाळ्याचा बनलेल्या या रेल्वे मार्गाचे काम गतीने व्हावे यासाठी पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे व खा. डाॅ. प्रितमताई मुंडे हया सातत्याने प्रयत्न करत आहेत. २०१९ पर्यंत रेल्वे प्रत्यक्ष धावण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी रेल्वेचे काम सध्या जलद गतीने सुरू आहे.  नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पातही या मार्गासाठी ४२५ कोटी एवढी भरीव तरतूद त्यांनी करून घेतली आहे.

या रेल्वे मार्गाकरिता २८२६ कोटी रुपये एवढा खर्च अंदाजित असून उक्त खर्चापैकी १४१३ कोटी रूपये एवढा पन्नास टक्के हिस्सा राज्य शासनाकडून केंद्रीय रेल्वे बोर्डास उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने मंत्रिमंडळ स्तरावर घेतला आहे.


त्यानुसार सदर रेल्वे मार्गासाठी शासनाने फेब्रुवारी २०१८ अखेर पर्यंत एकूण ७१६ कोटी ८४ लाख रुपये इतका निधी उपलब्ध करून दिला आहे. याच कालावधीत रेल्वे विभागाने ८७१ कोटी ९६ लाख रुपये इतका निधी वितरित केला आहे. राज्य शासनाच्या हिश्याचे सम प्रमाण राखण्यासाठी सन २०१७-१८ करिता रेल्वे विभागाने १४ मार्च २०१८ च्या पत्रान्वये मागणी केल्यानुसार या रेल्वे प्रकल्पासाठी अर्थसंकल्पित झालेल्या निधीपैकी ७५ कोटी रुपये एवढा निधी आज गृह खात्याने एका आदेशान्वये वितरित केला.